किरीट सोमय्यांनी अमरावतीतून कुणावर लावला निशाणा ?

विदर्भातील Vidarbha काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याचादेखील Cabinet Minister of Congress यामध्ये समावेश आहे. तसेच एका राष्ट्रवादीच्या मंत्र्याचीदेखील चौकशी होईल, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.
BJP Leader Kirit Somayya
BJP Leader Kirit SomayyaSarkarnama
Published on
Updated on

अमरावती : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. दिवसाआड ते राज्य सरकारवर हल्लाबोल करीत असतात. आज ते अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या सरकारमधील मंत्र्यांचे आणखी १२ घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे सुतोवाच त्यांनी आज केले. त्यामुळे आता कुणाचा नंबर लागेल, याची उत्सुकता लागलेली आहे.

दुपारी १२ वाजता राजापेठ येथील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. ते म्हणाले, आतापर्यंत आतापर्यंत २८ घोटाळे बाहेर आणले आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हा आकडा ४० पर्यंत जाणार आहे. या सरकारची पापं जनतेसमोर आणणार आहे. पुढील काही दिवसांत ठाकरे सरकारमधील चार मंत्र्यांची चौकशी होईल. यांपैकी दोन शिवसेनेसोबत संबंधित आहेत, तर विदर्भातील काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याचादेखील यामध्ये समावेश आहे. तसेच एका राष्ट्रवादीच्या मंत्र्याचीदेखील चौकशी होईल, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. आज अमरावतीमध्ये बोलत होते.

१२ नोव्हेंबरला हजारो लोक रस्त्यावर येतातच कसे? त्या दिवशी त्या तीन मिरवणुका या ठाकरे सरकारच्या प्रेरणेने झाल्या होत्या का? त्रिपुरातील अफवा कोणी पसरवली? याचा तपास ठाकरे सरकार का करत नाही? ठाकरे सरकार अजब सरकार आहे. अमरावतीमध्ये हिंदुत्वावर हल्ले होतात. त्यासाठी मी दौरा काढला तर मला त्यांनी निर्बंध घातले. ठाकरे सरकार ९२-९३ मध्ये झालेल्या घटनांची पुनरावृत्ती करतेय. आज बाळासाहेब नसतील. पण, त्यावेळी आम्ही एकत्र होतो. त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्रिपदासाठी समझोता करत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही. महाराष्ट्रात हिंदूंवर परत असा हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असेही सोमय्या म्हणाले.

BJP Leader Kirit Somayya
किरीट सोमय्या दिल्लीच्या मोहिमेवर, ठाकरे सरकारमधील मंत्री टेन्शनमध्ये

ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेने मला दिली आहे. त्यांचे मंत्री, नेते, अधिकारी तुरुंगात किंवा जामिनावर सुटले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत आणखी १२ घोटाळे उघडकीस आणणार आहे. अर्जून खोतकर यांचा साखर कारखाना घोटाळा बाहेर आला आहे. त्यांनी एपीएमसी मार्केटचा घोटाळा केला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने करोडो रुपये त्यांनी लुटले. त्याचा आम्ही उद्या खुलासा करणार आहोत, असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी सक्करसाथ परिसरातील शनी मंदिर परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील महिला तसेच व्यावसायिकांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com