Nagpur NIT Case : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या भुखंड घोटाळ्याच्या आरोपांनी सभागृह प्रचंड गाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधकांच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरणही दिलं.
सत्ताधारी आणि विरोधकामध्ये या भूखंड घोटाळ्यावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. तर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावरून पुन्हा आरोप करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आव्हाड म्हणाले, ''२००४ पासून या भूखंडाबाबत न्यायालयात कारवाई सुरू आहे. या प्रकरणात हा भूखंड सोडण्यात आला. तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जमिनीचा ताबा नव्हता. या प्रकरणात माहिती देणारे परचुरे नावाचे मध्यस्थी होते. त्यांनी कोर्टाला माहिती दिली. त्यांनी कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना निर्णय घेण्यात आल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले,'' असे ते म्हणाले.
याच विषयावर बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ''तब्बल ८३ कोटींचा भूखंड गैरनियमांनी आपल्या जवळच्या माणसाला देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालायने त्यांच्यावर ताशेरे ओढले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत बोलताना 'माझ्याकडे ही बाजू आलेली नव्हती. मला ही माहिती दिलेली नव्हती'. त्यामुळे सभागृहाचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे'', असं पटोले म्हणाले.
''त्याबरोबरच या प्रकरणामध्ये कोर्टाने जे ताशेरे ओढले ते अत्यंत भयानक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्या पद्धतीने भूखंडाचा घोटाळा केला आणि त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, या बाबतची राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही करतो'', असं पटोले म्हणाले.
अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ''नियमानुसारच या जमिनीचा व्यवहार झाला. कोर्टाने ताशेरे ओढलेले नाहीत. तर मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नसून NIT भूखंड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही'', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, ठाकरे गटाने विधानपरिषदेत देखील या प्रकरणावरून शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर या मागणीला राष्ट्रवादीने (NCP) देखील पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर काही वेळ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.