Winter Session : शाईफेकीचा धसका : विधिमंडळात शाईपेन नेण्यास बंदी!

Winter Session : खबरदारीचा उपाय पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
Winter Session Chandrakant Pat
Winter Session Chandrakant PatSarkarnama

Winter Session : पुण्यातील चिंचवड येथे भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेकली गेली होती. या घटनेनंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता विधान भवन परिसरात सुऱक्षेच्या दृष्टीकोनातून शाई पेनबाबत सतर्कता बाळगली जात आहे. येतील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत.

विधिमंडळ परिसरात शाई पेनावर आता सुरक्षेच्या कारणास्तव बंदी टाकण्यात आली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंळात प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींचे पेन तपासण्यात आले. याठिकाणी शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिबंध करणयात आलेले आहे.

Winter Session Chandrakant Pat
Sambhajiraje : सोलापूरचे खासदार हे महाराज; तरी त्यांनी विमानसेवेबाबत दिल्लीत आवाज उठवावा...
Winter Session Chandrakant Pat
Hasan Mushrif : कर्नाटक पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्यावर उगारली काठी : सीमाभागात तणावाचे वातावरण!

पुण्यात चिंचवड या ठिकाणी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला केला होता. या प्रकरणात आणखी दोन व्यक्तिसह, एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा धसका घेऊन यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही घेतला होता. बावनकुळांच्या एका कार्यक्रमातही पत्रकारांच्या पेनांची तपासण्यात आली होती. आजच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. विधिमंडळ परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचे पेन तपासण्यात आले.

या पेन तपासाच्या मुद्द्यावर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, याबाबतची सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. अशा प्रकारची शाईफेक होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com