Winter Session : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सीमावादाचा प्रश्न आता पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते, सीमाभागात मोर्चा घेऊन जात आहेत, तर नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद उमटले आहेत. यावर विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी उत्तरही दिले.
विरोधिपक्षनेते अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा सीमाप्रश्नी महत्त्वाची बैठक घेतली. सीमाप्रश्नावर काही वाद निर्माण झाले आहेत यामध्ये असं ठरलं होतं की, कोणीच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे यायला - जायला विरोध करणार नाही. मात्र असं ठरलं असतानाही, आपल्या एका खासदारांना बेळगावला जाण्यासाठी बंदी केली आहे. सातत्याने मराठी भाषिक तिथे भांडतायेत. आपण त्यांच्यासोबत उभे आहोत. मात्र कोणीच कोणाला अडवणार नाही, असं ठरलं असतानाही तिकडच्या जिल्हाधिकाऱ्याने बंदी कशी आणली? कर्नाटकची दडपशाही आपण खपवून घेता कामा नये, असा मु्द्दा अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधीपक्षनेत्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. केंद्रिय गृहमंत्र्यांनी सीमावादावर बैठक घेतली, हे गेल्या अनेक वर्षांमध्ये हे पहिल्यांदा घडलं. ही बाब त्यांनी गांभीर्याने घेतली. या बैठकीत आम्ही महाराष्ट्राची, सीमावासीयांची ठोस भूमिका घेतली. आमच्या इकडचे लोक, आमच्या इकडचे गाड्या, यावर हल्ले होतात. या गोष्टी घडता कामा नये, हे आम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं. त्यांनी कर्नाटकला समज दिली की, अशा गोष्टी घडू नयेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.