Amravati Election News: धीरज लिंगाडे आघाडीवर, येथेही भाजपला बसेल फटका?

Vote Counting : अजूनही कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरू झाली आहे.
Ranjeet Deshmukh and Dhiraj Lingade
Ranjeet Deshmukh and Dhiraj LingadeSarkarnama
Published on
Updated on

Amravati Division Graduate Constituency : गेल्या २८ तासांपासून अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरूच आहे. आतापर्यंत २७ उमेदवार बाद झालेले आहेत. दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरू झाली आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत अंतिम अधिकृत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये निकाल न लागल्यास पुढील प्रक्रिया ही अतिशय किचकट असते. त्यामुळे आता निकाल लागायला जास्त वेळ लागणार आहे. तरीही महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धीरज लिंगाडे विजयी होतील, अशी शक्यता दिसत आहे. पण रेसमध्ये असलेले धीरज लिंगाडे आणि डॉ. रणजीत पाटील हे दोघेही उमेदवार संयम ठेऊन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही आततायीपणा दिसून आला नाही. दोघांचेही समर्थक अंतिम अधिकृत निकालाची प्रतीक्षा करीत आहेत.

उमेदवारांना आतापर्यंत मिळालेली मते पुढीलप्रमाणे - धीरज लिंगाडे - ४३,९२९, डॉ. रणजीत पाटील - ४१,४६०, अनिल ओंकार अमलकार :4,256, अरुण रामराव सरनाईक :1,576, ॲड. आनंद रविंद्र राठोड : 402, पाटील झांबरे शरद प्रभाकर : 460, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी : 1,734.

अमरावती विभागातही भाजपला मोठा धक्का बसणार, अशी चर्चा कालपासूनच सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या विदर्भातच खिंडार पडू लागले आहे. याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपासून झाली. नागपुरात (Nagpur) महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली होती. अमरावतीमध्येही अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी भाजपचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना मात दिली होती.

Ranjeet Deshmukh and Dhiraj Lingade
Teacher-Graduate Election Results : शिक्षक-पदवीधर असूनही चुकले, 'तब्बल' इतकी मते बाद ठरली!

या निवडणुकीत जुनी पेन्शनचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे बघायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे ‘नो पेंशन - नो वोट’ अशी भूमिका शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी घेतली. त्याचा मोठा फटका भाजपला या निवडणुकीत बसला आणि हाच मुद्दा कॉंग्रेसच्या पथ्थ्यावर पडला. आज धीरज लिंगाडे विजयी घोषित झाल्यास भाजपला हा आणखी एक धक्का असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com