Yavatmal APMC Election : यवतमाळात आघाडी, युतीची घडी विस्कटली; बाजार समितीसाठी तिहेरी लढत !

Congress : काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आले आहेत.
APMC Yavatmal
APMC YavatmalSarkarnama

Considered highly prestigious. : यवतमाळ बाजार समिती अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. आतापर्यंत बाजार समितीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना एकत्र आली होती. त्यांची बाजार समितीवर सत्ता होती. यंदाही काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आले आहेत. (Congress and NCP remain in power)

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उतरविले आहे. त्यामुळे यवतमाळ बाजार समितीसाठी तिहेरी लढत होणार आहे. जिल्ह्यातील १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभुळगाव, वणी, पुसद तसेच महागाव या सात बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

दारव्हा, बोरी अरब, कळंब, राळेगाव, झरीजामणी मारेगाव, आर्णी तसेच घाटंजी या सात ठिकाणी रविवारी ३० एप्रिलला मतदान होऊ घातले आहे. बाजार समितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होईल अशी शक्यता होती. मात्र, अखेरच्या क्षणी काही ठिकाणी आघाडी, युती फिसकटली. त्याऐवजी वेगवेगळे समीकरण तयार करून नवा जुगाड करण्यात आला.

आघाडी, युतीची घडी विस्कटल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्‍यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अर्जाची संख्या वाढल्याने कोण कुणाकडून लढणार याचे अंदाज लावले जात होते. इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.

APMC Yavatmal
Bhandara APMC Election : भंडाऱ्यात भाजपची पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती, फडणवीसांच्या ‘त्या’ वाक्याची झाली आठवण !

उमेदवारी मागे घेतानाच शह-काटशहाचे राजकारण (Politics) अनुभवायला मिळाले. १५ पैकी काही बाजार समित्यांमध्ये सोईस्करपणे महाविकास आघाडी तसेच महायुतीचा धर्म मोडून नवे जुगाड करण्यात आले. काही बाजार समितीत काँग्रेस-ठाकरे गटाची आघाडी झाली असून राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे.

काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या (NCP) विरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत (ApMC Election) स्थानिक राजकारण वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. सोईस्कर जुगाड असले तरी खरी लढत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती अशीच होण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com