Yavatmal APMC Election: सहकारातील वर्चस्वासाठी आजी-माजी मंत्री भिडणार, अभद्र युतीचीही शक्यता !

Yavatmal Local Leaders : स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
Yavatmal APMC
Yavatmal APMC Sakarnama

Yavatmal News: सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आजी-माजी मंत्र्यांसह आमदार, माजी आमदार, स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नेते तयारीला लागले आहेत. (Leaders are preparing to maintain their reputation)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दीड वर्षानंतर बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील काही बाजार समितींवर गेल्या काही वर्षांपासून प्रशासक होते. त्या बाजार समितीतही निवडणूक होणार आहे. यवतमाळ, दारव्हा, बोरी अरब, नेर, दिग्रस, पुसद, आर्णी, घाटंजी, वणी, झरीजामणी, बाभूळगाव, राळेगाव, कळंब, महागाव तसेच मारेगाव या बाजार समितीसाठी येत्या २८ आणि ३० एप्रिलला दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

आपल्या भागातील बाजार समितीवर आपली सत्ता असावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पालकमंत्र्यांपासून तर बाजार समितीच्या माजी सभापतीपर्यंत सर्वांनीच तयारी सुरू केली आहे. जिल्ह्‍यातील १६ पैकी १५ बाजार समितीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

सध्याचे राजकीय चित्र पाहता बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होण्याचे संकेत आहेत. यांच्या विरोधात भाजप, शिंदे गटाला सोबत घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहे. मात्र, राज्यस्तरावरील या आघाड्यांचा परिणाम सहकारातील निवडणुकीत फार कमी दिसण्याची शक्यता आहे.

Yavatmal APMC
बंडाळीच्या परिस्थितीत नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत !

स्थानिक परिस्थितीनुसार काही बाजार समितीत समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. एक-दोन बाजार समितीत काँग्रेस (Congress) तसेच राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी अभद्र युतीची शक्यता आहे. त्यामुळे कोण कोणासोबत जाणार, हे चित्र २० एप्रिलनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी सर्वच नेत्यांनी बाजार समितीत (Market Committee) आपला सभापती असावा, यासाठी कंबर कसली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com