Yavatmal District APMC Analysis : बाजार समितीच्या निकालाने महाविकास आघाडी चार्ज !

Congress : काँग्रेसची जिल्ह्यात आजही पकड असल्याचे दिसून आले.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

Yavatmal district was once a Congress stronghold : जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या काही काळात काँग्रेसला जिल्हा गमवावा लागला. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची जिल्ह्यात आजही पकड असल्याचे दिसून आले. १५ पैकी सात बाजार समित्या महाविकास आघाडीकडे आहेत. विशेष म्हणजे, सर्वच बाजार समित्यांमध्ये काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले आहे. (Congress has got representation in all market committees)

बँकफुटवर गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी बाजार समितीच्या निकालाने चांगलेच चार्ज झाले आहेत. जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांपासून ते स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बाजार समित्यांच्या निकालानंतर अनेक दिग्गजांना फटका बसला असून, काही नेते आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

सात बाजार समित्यांवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. तीन बाजार समित्यांवर काँग्रेस, तर एका बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. वणी, महागाव बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. इतर ठिकाणी तडजोड आघाड्यांची सत्ता आली आहे. पक्षनिहाय विचार केल्यास जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संचालक सर्वच बाजार समित्यांत निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी काँग्रेस पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना दिग्रस बाजार समितीत धक्का बसला असला तरी दारव्हा व नेर बाजार समित्या त्यांच्या ताब्यात आहेत. कळंब, राळेगाव, मारेगाव या तीन बाजार समित्यांत काँग्रेस स्वबळावर विजयी झाली आहे. झरी जामणी बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जिल्ह्यात पुसद व दिग्रस मतदारसंघवगळता उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.

Mahavikas Aghadi
Buldhana District APMC: बाजार समित्यांमध्ये आघाडीचा डंका अन् सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा !

भाजप (BJP) नेत्यांनी बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, त्यांना यात यश आले नाही. काही बाजार समित्यांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. कुठे भाजप तर कुठे आपल्याच मित्रपक्षाचा पराभव करीत काँग्रेसची (Congress) कामगिरी चांगली राहिली आहे. बाजार समित्यांमधील या विजयाने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे इरादे बुलंद झाले आहेत. याचा परिणाम आगामी निवडणुकीत (Elections) दिसेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com