Eknath Shinde News : शिंदे गटाला पहिला धक्का! जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा; कारण...

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पहिला धक्का बसला आहे.
Eknath Shinde, Gajanan Bejankiwar
Eknath Shinde, Gajanan BejankiwarSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यवतमाळमध्ये (Yavatmal) धक्का बसला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर बेजंकीवार (Gajanan Bejankiwar) यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिल्याची माहीत आहे. बेजंकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे मानले जातात. तरी त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हादरे दिले आहेत. राज्यातील ४० पेक्षा जास्त आमदार आणि १३ खासदार त्यांनी आपल्याकडे वळवले आहेत. मात्र, देंसमोर पेच उभा ठाकला आहे. पहिल्यांदात त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा हात धरून बेजंकीवारही शिंदे गटात सामील झाले होते.

Eknath Shinde, Gajanan Bejankiwar
Satyajit Tambe News : तांबेंनी खेळलेली खेळी त्यांच्यावरच उलटणार? आघाडीचे ठरले; पाठिंब्याबात भाजपची कोंडी

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत होते. राठोड यांच्या विश्वासातील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. बेजंकीवार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाची सुत्रेही त्यांच्याकडेच होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर बेजंकीवार यांच्याकडे जिल्हाप्रमुख पद सोपवण्यात आले होते.

त्याचबरोबर आर्णी व वणी तालुक्याचेही काम त्यांच्याकडेच होते. मात्र, अशातच बेजंकीवार यांनी अचानक जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पांढरकवडा तालुक्यात बेजंकीवार यांचा समर्थ मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे बेजंकीवार यांच्या राजीनाम्याने शिंदे गटाला पहिला धक्का बसला आहे.

Eknath Shinde, Gajanan Bejankiwar
Sanjay Shirsat News : निवडणूक आयोगाचा निकाल लागू द्या, उद्धवसेनेत कुणीच राहणार नाही..

बाजारसमितीच्या राजकारणावरुन मतभेद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतात की, पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजीनामा मागे घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड बेजंकीवार यांची मनधरणी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com