Yavatmal-Washim Lok Sabha : ‘या’ मतदारसंघात 'भावना' गळून पडणार आणि ‘मोहिनी’ चालणार?

Mohini Naik : मोहिनी नाईक यांच्या नातेवाइकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी निकटचे संबंध आहेत. अखेर, 'आले मोदी-शाहांच्या मना, तेथे कुणाचे चालेना...' या उक्तीप्रमाणे येथील राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Bhavana Gawali, Sanjay Rathod, Sanjay Deshmukh and Mohini Naik
Bhavana Gawali, Sanjay Rathod, Sanjay Deshmukh and Mohini NaikSarkarnama
Published on
Updated on

दिनकर गुल्हाने

Yavatmal-Washim Lok Sabha : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी क्रीडा राज्यमंत्री दिग्रसचे संजय देशमुख यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पण शिवसेना शिंदे गटाकडून पाच वेळा विजयी झालेल्या खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीवर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेले नाही. कॅबिनेट मंत्री संजय राठोड लोकसभा निवडणूक लढविण्यास अनुत्सुक आहेत, खासदार भावना गवळी निवडून येण्याची भाजपला खात्री नाही. त्यामुळे शिंदे गटाकडून नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची अधिक शक्यता आहे.

पुसद येथील नाईक घराण्यातील सून व आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी यांचे नाव आघाडीवर आहे. 'चार सौ पार'च्या शर्यतीत शिंदे गटाकडून मोहिनी नाईकांची नौका पार होणार का, ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा या पुसदला आल्या असता, खासदार भावना गवळी यांच्या रिपोर्ट कार्डबद्दल पत्रकारांनी छेडले, तेव्हा भाजप त्यावर विचार करेल, असे मोघम उत्तर देऊन भावना गवळींबद्दल असलेल्या जनतेतील नाराजीचा एक प्रकारे सूर त्यांनी आळवला. भावना गवळी यांना तिकीट दिले, तर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार लोकसभेत जागा बळकावणार, याचा अंदाज भाजपला आलेला आहे.

शिंदे गटाला ही जागा गमवायची नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यावर उमेदवारीसाठी दबाव येत आहे. वास्तविक पाहता संजय राठोड यांची लोकसभेत जाण्याची मानसिक तयारी नाही. दुसरीकडे भावना गवळी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख निवडून आले तर तेही संजय राठोड यांना परवडणारे नाही. अशा स्थितीत शिंदे गटाकडून मराठा उमेदवार म्हणून मनीष उत्तमराव पाटील यांचे, तर या बंजाराबहुल लोकसभा मतदारसंघात पुसद येथील दिग्गज नेते, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांची सून मोहिनी इंद्रनील नाईक यांचे नाव पुढे आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhavana Gawali, Sanjay Rathod, Sanjay Deshmukh and Mohini Naik
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, दारव्हा-दिग्रस या बंजाराबहुल मतदारसंघातून मोहिनी नाईक यांची उमेदवारी अधिक प्रभावी ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. यवतमाळ जिल्ह्यात माजी मंत्री मनोहर नाईक यांचा प्रभाव राहिलेला आहे. शिवाय मंत्री संजय राठोड यांचे पाठबळ, यवतमाळात आमदार मदन येरावार राळेगावात आमदार अशोक उईके यांचा पाठिंबा त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला चांगली लढत देत पुन्हा हा मतदार संघ महिला वर्चस्वाचा ठरू शकतो, असा गतिमान झालेल्या राजकारणाचा सूर दिसतो आहे. विधान परिषद सदस्य भाजपचे आमदार निलय नाईक यांनी विरोध बाजूला ठेवला तर शिवसेना शिंदे गटाकडून मोहिनी नाईकांची उमेदवारी चढाओढीच्या राजकारणात जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'नवा गडी नवा राज' अशा राजकीय परिस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास अजित पवार यांचा अर्थातच होकार असणार आहे. अमरावती पॅटर्नमध्ये राणा पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवतात. हाच पॅटर्न यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात राबविण्यास अजित पवार यांचा विरोध नाही, अशी माहिती आहे. खासदार भावना गवळी यांनी शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयापुढे वाढवली असली तरी भाजपचे 'रिपोर्ट कार्ड' आडवे येण्याची दाट शक्यता आहे.

मोहिनी नाईक या मूळ गुजरातमधील आहेत. त्यांच्या नातेवाइकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी निकटचे संबंध आहेत. अखेर, 'आले मोदी-शाहांच्या मना, तेथे कुणाचे चालेना...' या उक्तीप्रमाणे राजकारणात 'भावना' गळून पडतील, मतदारसंघावर 'मोहिनी'चीच जादू चालणार का, याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

Edited By : Atul Mehere

R

Bhavana Gawali, Sanjay Rathod, Sanjay Deshmukh and Mohini Naik
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com