Vidarbha : तुम्ही जनतेच्याही पाठीत खंजीर खुपसला; ठाकरेंनी तोफ डागली

Aditya Thackeray| हिमंत नव्हती म्हणून ते गुवाहाटीला पळून गेले, ४० गद्दाराांनी घटना बाह्य सरकार बनवलं,
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

अकोला : आमच्या रक्तात प्रेम, निष्ठा, स्वाभिमान आहे. आमच्या चेहऱ्यावर लपवण्यासारखं काही नाही. आपण चोरी केली नाही, पण दुसरीकडे जे ४० गद्दार पळून गेले जे पळून गेले त्यांनी घटनाबह्य सरकार बनवलं आहे. सरकार बनवूनही आज शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, महिलांवर अत्याचार वाढत आहे. सरकारचं लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण आज राज्यात खरे मुख्यमंत्री कोण हेच कोणाला माहिती नाही. हिमंत नव्हती म्हणून ते गुवाहाटीला पळून गेले, ४० गद्दाराांनी घटना बाह्य सरकार बनवलं, ते आज गद्दारीचे शिक्के माथ्यावर घेऊन फिरत आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चाळीस बंडखोर आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे.

आदित्य ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यात जाहीर सभेत बोलताना त्यांनी चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या राज्यातल्या सध्याच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री कोण आहेत हे माहिती आहे का तुम्हाला, असा सवाल करत या उद्योगमंत्र्यांचे काय उद्योग आहेत ते आम्हालाही माहिती नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला.

Aditya Thackeray|
MIDC : माणदेशातील कॉरिडॉरसाठी देवेंद्र फडणवीसांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय....

नवीन सरकार आल्या आल्या उद्योग मंत्र्यांनी एक काम केलं, महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. दुसरा मेडिकल डिव्हाईस पार्कचा प्रकल्पही पळवून लावला, तिसरा बल्क ड्रग पार्कचा, असे चार प्रकल्प त्यांनी दुसऱ्या राज्यात पळवून लावले. ठिक आहे, तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, गुवाहाटीला पळून गेला, तुमच्यात हिंमत नव्हती महाराष्ट्रात राहून गद्दारी करण्याची म्हणून तुम्ही, गोवा, सुरत गुवाहाटीला गेलात. हे सर्व करत असताना आता जो खंजीर तुम्ही आमच्या पाठीत खुपसला तोच आज तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्याही पाठीत खुपसत आहात, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

विदर्भात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, परतीच्या पावसानेही शेतीचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, पंचनामे झाले नाही, पिकविमा मिळाला नाही. आज उद्धव ठाकरे असते तर उद्धवजी असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आम्ही सर्वांनी ओरडून ओरडून ओला दुष्काळ जाहीर करा किंवा खुर्च्या खाली करा अशी मागणी करत होतो. पण राज्य सरकारने ऐकलं नाही, पण शिंदे गट आणि भाजप खुर्च्या घट्ट पकडून बसलं आहेत. हे खुर्च्या सोडायला तयार नाहीत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्र एकेकाळी उद्योगात सर्वात पुढे होता. ठाकरे सरकार आल्या आल्या सर्वात आधी शेतऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. जो शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळला, सुभाष देसाई उद्योग मंत्री होते. कोविडच्या काळातही दोन वर्षात साडेसहा लाख कोटींचे रोजगार आणले. लाखो रोजगार आणले, जे दुसऱ्या कोणत्याही राज्याला जमलं नाही ते महाराष्ट्राने करुन दाखवलं. हे आपलं सरकार होते. पण आता जे सरकार घटनाबाह्य सरकार राज्यात स्थापन झालं आहे, लिहून घ्या ते काही महिन्यात कोसळणार म्हणजे कोसळणार आणि मध्यावधी निवडणूका लागणार असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com