Buldana Maratha Protest : धक्कादायक ! मराठा आरक्षणासाठी तरुणाचे टोकाचे पाऊल; गॅलरीतून उडीचा प्रयत्न

Sambhaji Bhakre Try to Self Harm : बुलडाण्यातील मोर्चात सहभागी तरुणाच्या निर्णयाने खळबळ
Sambhaji Bhakre Patil
Sambhaji Bhakre PatilSarkarnama

Buldana News : आरक्षणासाठी जालन्यात सुरू झालेल्या आंदोलनामुळे राज्यातील मराठा समाजातील तरुण आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. याच धर्तीवर बुलडाण्यात बुधवारी सकल मराठा समाजाच्यावतीन मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, आरक्षणाच्या समर्थनार्थ एका तरुणाने गॅलरीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मोर्चातील स्वयंसेवकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच एका घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. (Latest Political News)

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बुलडाण्यात मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही समाजबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरात जमले होते. मोर्चाला सुरुवात होण्यासाठी काही अवधी शिल्लक असतानाच जिजामाता व्यापार संकुलाच्या गॅलरीतून एका युवकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. शहरातील जयस्तंभ चौकाजवळ हा प्रकार घडल्याने आंदोलनस्थळी चांगलीच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच मोर्चातील स्वयंसेवक गॅलरीकडे धावले. त्यांनी उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला रोखले.

Sambhaji Bhakre Patil
Sangram Jagtap News : अजित पवार गटाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळाले नाही, तर...'

संभाजी भाकरे पाटील (रा. नांदुरा) हे युवकाचे नाव असलल्याचे पोलिसांनी सांगितले. मोर्चातील स्वयंसेवकांनी संभाजी पाटील याची समजूत घातली. हा युवक शांत झाल्यानंतर मोर्चाला नियोजित स्थळावरून सुरुवात करण्यात आली. संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजातील तरुणींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Maharashtra Political News)

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे.आरक्षणासाठी कायद्याच्या नियमांनुसार सर्व काही करू, असे अश्वासन सरकारने दिले आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समितीही स्थापन केलेली आहे. त्याचा अहवाल महिन्याभरात येणार आहे. असे असले तरी समाजातील युवक दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. जालन्यातील आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठा समाजातील एका तरुणाने आणि एका दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. युवक आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन समाजासह सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sambhaji Bhakre Patil
Manoj Jarange Patil : "माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं, तर..."; मनोज जरांगेंची बहीण आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com