युवक काॅंग्रेस आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाच्या फलकांवर ‘गुजरात’च्या पाट्या

वेदांता पाठोपाठ मिहानमधील (Mihan) प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातने (Gujrat) पळवल्याने युवक काँग्रेसच्यावतीने (Youth Congress) अनोखे आंदोलन करण्यात आले.
Youth Congress
Youth CongressSarkarnama

नागपूर : टाटा एअरबस नागपूरच्या मिहानमधून गेल्याच्या बातम्या आल्यापासून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडले आहेत. सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासाठी केंद्रातील भाजप सरकारला दोषी धरले जात आहे. नागपुरात युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना नागपुरातील (Nagpur) ‘रामगिरी’या निवास्स्थासमोरील नामफलकावर महाराष्ट्राऐवजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘गुजरात’ असा पाट्या लावल्या.

वेदांता पाठोपाठ मिहानमधील (Mihan) प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातने (Gujrat) पळवल्याने युवक काँग्रेसच्यावतीने (Youth Congress) अनोखे आंदोलन करण्यात आले. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांना (Police) ही बाब कळताच तातडीने सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) नावासमोर चिटकवलेल्या गुजरातच्या पट्ट्या काढून टाकल्या.

वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसले आहेत. ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक प्रकल्प मोदींच्या राज्यात जात आहे त्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातसाठी काम करीत असल्याची शंका येते, असा आरोप यावेळी कुणाल राऊत यांनी केला. टाटा एअरबस प्रकल्प नागपूर आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकला असतो. कोट्यवधीची गुंतवणूक आणि हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आल्याचा आरोपही यावेळी कुणाल राऊत यांनी केला.

Youth Congress
युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात

आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग, प्रदेश महासचिव असिफ शेख, इर्शाद शेख, फजलूर रेहमान कुरेशी, आश्विन बैस, अक्षय डोर्लीकर, इर्शाद शेख, इमरान पल्ला, वसीम खान, आशिष मंडपे, अनिरुद्ध पांडे, दुर्गेश पांडे, नीलेश खोबरागडे, शीलज पांडे, सतीश पाली, रशीद अन्सारी, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, प्रणय सिंग ठाकूर, फरमान अली, दया शाहू, रौनक नांदगावे, मंगेश डाखोळे, हर्ष बर्डे, उज्ज्वल खापर्डे, आरोन खोचडे, मुरलीधर शाहू, निशाद इंदूरकर आदींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com