Youth Congress News : बैठकीत खुर्च्या फेकणे भोवले, युवक कॉंग्रेसचे चार पदाधिकारी निलंबित...

Kunal Raut : काही कार्यकर्त्यांनी कुणाल राऊत यांना हटवण्याची मागणी केली.
Youth Congress Meeting in Mumbai
Youth Congress Meeting in MumbaiSarkarnama
Published on
Updated on

How Congress fell behind due to factionalism : कॉंग्रेसमधील गटबाजी सोडली तर सर्व काही ठीकठाक आहे. पक्षाची आज जी दयनीय अवस्था आहे, ती केवळ गटबाजीमुळेच. असे म्हटले जाते की, कॉंग्रेसला राज्यात वा केंद्रात विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचीही गरज नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवाय पक्ष विजय मिळवू शकतो. पण गटबाजी संपुष्टात आली पाहिजे. (The party can win without Shiv Sena and NCP)

गटबाजीमुळे कॉंग्रेस कशी पिछाडीवर आली आणि पक्ष का सोडला, हे परवा (ता. १८) माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी सांगितले. त्यानंतर युवक कॉंग्रेसमधील गटबाजीचा आणखी एक नमुना शनिवारी (ता. १७) समोर आला.

मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. प्रकरण एकमेकांवर खुर्च्या फेकण्यापर्यंत गेले. राष्ट्रीय अध्यक्षांनी राडा करणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही व सचिव इरशाद शेख यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. शनिवारी मुंबई येथे युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक पार पडली. यात प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळून आला होता.

Youth Congress Meeting in Mumbai
धर की आपट ; युवक काँग्रेसमध्ये मारामाऱ्या | Yuvak Congress | Sarkarnama | #shorts

काही कार्यकर्त्यांनी कुणाल राऊत यांना हटवण्याची मागणी केली. सोबतच खुर्च्यांची फेकाफेक करून मोठा राडा केला होता. मुंबई (Mumbai) येथे झालेल्या बैठकीत युकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास हेसुद्धा उपस्थित होते. नाराज होऊन ते तत्काळ दिल्लीला निघून गेले होते.

आता चार पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून राडेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. तनवीर विद्रोही, इरशाद शेख यांच्यासह कराड दक्षिणचे अध्यक्ष दिग्विजय पाटील व प्रदेश सचिव उमेश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. बी.वी. श्रीनिवास यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

Youth Congress Meeting in Mumbai
BJP on Congress: युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा : काँग्रेसने आपली संस्कृती दाखवलीच; भाजपची टीका

अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राडा करणाऱ्यांच्या मागचा सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर समाधानकारक उत्तर दिले नसल्याने युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेश प्रभारी उदय भान, मितेंद्र सिंह, सहप्रभारी कुमार रोहित व एहसान खान यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com