Vijay Shivtare Vs Ajit Pawar News : शिवतारे अपक्ष लढण्याची भूमिका बदलतील, फडणवीस लवकरच घेणार भेट; गिरीश महाजनांचे मोठे विधान

Bjp News : माजी मंत्री शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीमधील दोन घटक पक्ष आमने-सामने आले आहेत.
Vijay Shivtare ajit pawar
Vijay Shivtare ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन दिवसांतच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये थेट सामना होईल, अशी शक्यता असताना दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीमधील दोन घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. (Vijay Shivtare Vs Ajit Pawar News )

Vijay Shivtare ajit pawar
Vasant More Resign MNS : 'ती' फेसबुक पोस्ट ठरली वसंत मोरे यांच्या राजीनाम्याला कारणीभूत?

या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने पुढाकार घेतला आहे. याबाबत महायुतीच्या घटक पक्षाची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्या बैठकीत या वादावर चर्चा होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

त्यासोबतच या प्रकरणी शिवसेना नेते विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याची घेतलेली भूमिका बदलतील, असा विश्वास व्यक्त करीत या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत. येत्या दोन दिवसांत फडणवीस हे विजय शिवतारे यांची भेट घेऊन या वादावर तोडगा काढतील, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आता महायुतीमधील वादावर कशाप्रकारे पडदा टाकला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार (Ajit pawar) यांच्यावर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे व प्रवक्ते अमोल कोल्हे यांनी शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे महायुतीमधील वातावरण चांगलेच बिघडले आहे. त्यामुळे या वादावर आता काय तोडगा काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

R

Vijay Shivtare ajit pawar
Vijay Shivtare On Ajit Pawar : विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम, अजितदादांवर केली आगपाखड

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com