Vijay Wadettiwar : 100 फुटाच्या रॅम्पवर मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री 'रॅम्प वॉक' करतात, फॅशन-शो आहे काय? विजय वडेट्टीवारांचा संताप

Vijay Wadettiwar was furious with Devendra Fadnavis and Dharmarao Baba Atram : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमधील आरोग्य व्यवस्थेवरून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर संतापले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : "महायुती सरकारचे 'इन्व्हेंट' चाललेत, 100 फुटाचा रॅम्प करतात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात. फॅशन-शो आहे काय? लाडकी बहीण म्हणून महिलांचा कार्यक्रम घेताना, फॅशन-शो करायला निघालेत, इन्व्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत", अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती भाजप सरकारवर संतापले.

एवढं दारिद्र्य आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं, असाही टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

काँग्रेस (Congress) नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतील घटनेवर संताप व्यक्त केला. तापानं फणफणलेल्या मुलांना वेळेवर उपचार न मिळाल्यानं दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते आणि रुग्णवाहिका नसल्याने, या मुलांचे मृतदेह आईवडिलांनी खांद्यावर घेऊन आरोग्य केंद्रापर्यंत 15 किलोमीटर पायपीट केली. यावर विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर संतापले.

Vijay Wadettiwar
NCP News Video : जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल? अजितदादांच्या नेत्याचा शरद पवार गटाला सवाल

'भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गेली दहा वर्षे ते सत्तेत आहे. आरोग्य यंत्रणा त्यांना बळकट करता आली नसती? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला. रुग्णवाहिका नाही, डाॅक्टर नाही, नर्स नाहीत, 70 टक्के जागा रिक्त करून ठेवल्या आहेत. आरोग्य खाते कुठे आहे? टेंडरसाठी आरोग्य खातं आहे काय? सर्वात जास्त भ्रष्टाचार कोठे असेल, तर आरोग्य खात्यात आहे', असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
BJP Vs NCP : 'खंडणी'वरून राजकारण पेटले, पुरावा दाखवत शरद पवार गटाचे भाजपला प्रत्युत्तर

अन्न व औषध मंत्री धर्माराव आत्राम यांच्यावर देखील विजय वडेट्टीवर भडकले. "ते मंत्री काय करतात, पालकमंत्री काय करतात, दोन-दोन मृतदेह खांद्यावर टाकून घेऊन जावं लागतं, त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही, जीव गमवावा लागतो, यापेक्षा अनास्था महाराष्ट्रात दिसत नाही, वर इन्व्हेंट करत आहेत", असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

पालकमंत्री फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री आत्राम या दोघांनी या घटनेवर उत्तर द्यावेच लागले. तसं अपेक्षित आहे. नाहीतर आहेच माफी, माफी मागायची मोकळं व्हायचं पापातून, जसं महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर माफी मागितली. माफी मागितल्यानंतर काय, पण लोकांचा जीव जातोय, यांचं उत्तर अपेक्षित आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

लाडकी बहीण योजनेत होत असलेल्या कार्यक्रमावर देखील विजय वडेट्टीवार संतापले. ते म्हणाले, "महायुती सरकारचे इन्व्हेंट सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेत कार्यक्रम सुरू आहेत. 100 फुटाचा रॅम्प टाकले जातात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात. फॅशन-शो आहे काय? महिलांचे कार्यक्रम घेताना, फॅशन-शो करायला निघालेत, इन्व्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत", अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी महायुती भाजप सरकारला फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com