Vinayak Raut News : विनायक राऊतांचा नारायण राणे, फडणवीस, राज ठाकरे अन् केसरकरांवर जोरदार प्रहार, म्हणाले...

Vinayak Raut Vs Rane, Fadnavis , Kesarkar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातीलच नव्हे तर देशपातळवरील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपासह भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरण सामंत, राज ठाकरे आणि दिपक केसरकर या नेत्यांवर टीका केली आहे.

'माझं डिपॉझीट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. चार जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. चार जून नंतर त्यांची झोप उडेल.' असं विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना उद्देशून म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना, 'भाजपच खोट बोल पण रेटून बोल असं त्यांचं चाललेल आहे. उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राहीली नाही.' असं राऊत म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinayak Raut
Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हातून गेल्यानंतर सामंत बंधू नारायण राणेंच्या प्रचारात...

याशिवाय मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं दुकान आता बंद झालं, असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर आल्यावरून टोला लगावताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी मिरची आहे. त्यांच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही. अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाकी आहे ती.'

याचबरोबर मंत्री दिपक केसरकर यांनी विनायक राऊतांचे दुकान बंद करणार असं म्हटलं होतं. यावर बोलताना केसरकर यांच्या वक्तव्यावर हसू येतय. कारण सत्तेसाठी ज्या नारायण राणेंनी केसरकरांना लाथाडलं त्यांचे पायाचे तळवे चाटण्याची वेळ त्यांच्यावर येते यापेक्षा दुसरा विनोद नाही. असं विनायक राऊतांनी म्हटलं.

Vinayak Raut
Narayan Rane: अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार ..., उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंचा दावा

तसेच, दिपक केसरकर यांनी कोकण वासीयांना आता शहाणपण शिकवू नये. स्वत:च्या शिक्षण खात्यात काय दिवे लावलेत ते बघा. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षण मंत्री म्हणून दिपक केसरकर यांच नाव इतिहासात लिहील जाणार. अशी टीकाही केली. तसेच शरद पवार यांनी दिपक केसरकर यांना आमदार केल, उद्धव ठाकरे यांनी मंत्री केल त्या खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही दिपक केसरकर यांची औलाद आहे. अशा तीव्र शब्दांत विनायक राऊतांना दिपक केसरकरांवर घणाघात केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com