Narayan Rane: अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार ..., उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंचा दावा

Lok Sabha Election 2024: भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिली आहे. तसेच या जागेवर दावा करणाऱ्या सामंत बंधूंनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं सांगितलं आहे. सामंत बंधूंनी माघार घेतल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे असं वक्तव्य राणेंनी केलं आहे.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या वेळी राणे म्हणाले, कुठलंही काम सुरू करायचं असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर मी ग्रामदेवतचं दर्शन घेतो. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जागावाटपाबाबत कोणताही तिढा नव्हता. हा केवळ पक्षाचा युक्तिवाद होता. मला उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहीत होतं, त्यामुळे मी प्रचाराला सुरुवात केली होती, असा दावाही राणेंनी या वेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र, अद्याप महायुतीतील काही मतदारसंघांतील जागावाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे युतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आज महायुतीला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यात यश आलं आहे. कारण भाजपने (BJP) नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी दिली आहे, तर या जागेवर दावा करणाऱ्या सामंत बंधूंनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं सांगितलं आहे. सामंत बंधूंनी माघार घेतल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असं वक्तव्य राणेंनी केलं आहे.

Narayan Rane
Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटला; नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंतांची माघार

राणे म्हणाले, मी सामंत बंधूंचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्रा अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्धल मी त्यांचाही आभारी आहे. तसेच विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये 400 पार करायचं आहे. तसेच आपला देश विकसित बनावा आत्मनिर्भर बनावा हे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राणेंनी सांगितलं. तसेच उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, मी शक्तिप्रदर्शन करत नाही. परंतु अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास राणेंनी या वेळी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

R

Narayan Rane
Baramati Lok Sabha News : बारामतीत अजितदादांनी ‘अशी’ केली जुळवाजुळव; स्टेजवरून सांगितली शिलेदारांची नावं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com