मुंबईची नाही पण दुसऱ्या पालिकेची तावडेंवर मोठी जबाबदारी!

विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा नुकतीच नियुक्ती झाली आहे.
Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama

मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम ठेवण्यात आल्यानंतर पक्षाने आता राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या खांद्यावर आणखी एक अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.

आगामी चंदीगढ महापालिका निवडणुकीसाठी (Punjab/Chandigarh municipal corporation) भाजपने विनोद तावडेंना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. ट्विटरवरुन याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्यांच्याकडे सध्या हरियाणा निवडणूक प्रभारी पदाची देखील जबाबदारी आहे. मुंबई महापालिकेतील भाजपची सूत्रे तावडे यांनी 2017 पर्यंत हाताळली होती. तेथे भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. त्यानंतर तावडे यांचे महाराष्ट्र भाजपमधील स्थान टप्प्याटप्प्याने आक्रसत गेले. मंत्री म्हणून त्यांच्याकडे असलेली काही खाते कमी करण्यात आली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकिटही नाकारण्यात आले. त्यानंतर त्यांना आता राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात येत आहे.

कृषी कायदा आणि उत्तरेत पंजाब, हरियाणा, चंदीगढच्या शेतकऱ्यांचे सुरु असलेले शेतकरी आंदोलन, पंजाबची आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी महत्त्वाची असणार आहे. शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी विनोद तावडे यांची नियुक्ती जाहिर केली. तसेच भाजपकडून तावडेंसह भाजप राज्यसभा सदस्य इंदु बाला गोस्वामी यांनाही सह प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Vinod Tawde
अडगळीत पडल्यानंतर शांत राहलेले विनोद तावडे `यामुळे` पुन्हा प्रकाशझोतात

चंदीगढ महापालिकेच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या अखेरिस होणार आहेत. याआधी 2016 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपने 26 पैकी 20 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर काँग्रेसने 4 आणि अकाली दलाने 1 जागा जिंकली होती. आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते चंदीगढमध्ये काय कामगिरी बजावतात, हे पाहायला हवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com