BJP Maharashtra : बिहारची मोहीम फत्ते होताच विनोद तावडेंचं महाराष्ट्रात कमबॅक : विखे पाटील, शिवेंद्रराजेंनाही भाजपमध्ये 5 वर्षातच मानाचे पान

BJP Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. फडणवीस, गडकरी, बावनकुळे, पाटील, मुंडे यांसह प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश आहे.
BJP leaders Devendra Fadnavis and Nitin Gadkari among key star campaigners for Maharashtra civic polls.
BJP leaders Devendra Fadnavis and Nitin Gadkari among key star campaigners for Maharashtra civic polls.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने यापूर्वी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यादी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रचारासाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात विनोद तावडेंचेही नाव असून बिहारची मोहीम फत्ते होताच महाराष्ट्रात त्यांचे कमबॅक झाले आहे. त्यासोबतच विखे पाटील, शिवेंद्रराजेंनाही भाजपमध्ये 5 वर्षातच मानाचे पान देण्यात आले आहे.

राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. राज्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे.

BJP leaders Devendra Fadnavis and Nitin Gadkari among key star campaigners for Maharashtra civic polls.
Shivsena Vs NCP : राष्ट्रवादीची हुकूमत मोडीत निघणार? तटकरेंच्या विरोधात शिवसेना आमदाराला भाजपची रसद?

आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

या बड्या नेत्यांचा समावेश

भाजपने (BJP) आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.

BJP leaders Devendra Fadnavis and Nitin Gadkari among key star campaigners for Maharashtra civic polls.
Congress News: महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आघाडीत नवा वाद; काँग्रेस नेत्यांना कारणे दाखवा नोटीस

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

विनोद तावडेंचे कमबॅक

बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्यावर होती. आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात होत असल्याने या निमित्ताने विनोद तावडे यांचे राज्याच्या राजकारणात कमबॅक झाले आहे. त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकातील स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com