टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध?

राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ञांची दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध?
Published on
Updated on

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरीयंटचा (Omicron Variant) शिरकाव झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १० जणांना ओमिकॉनची लागण झाली आहे. या पार्श्वभुमीवर ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याविरोधात उपाययोजना करण्यासाठी राज्यातील टास्क फोर्सची (Task Force) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून ओमीक्रोन विषाणूच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत ओमीक्रॉन किती घातकता, त्याचे दुष्परिणाम, संसर्ग आणि उपाययोजन या सगळ्या विषयावर चर्चा झाली. त्याचबरोबर या बैठकीत झिम्बाब्वेमध्ये आढळलेल्या विषाणूवर देखील चर्चा करण्यात आली.

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध?
105 नगरपालिका आणि दोन ZP तील ओबीसी मतदारसंघांतील निवडणूक रद्द

दरम्यान, दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही ओमीक्रॉनचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याविषयी देखील काही डॉक्टरांनी सूर आळवल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनचा संसर्ग पाहता लॉकडाऊन ऐवजी नियमांचं कठोर पालन केल्यास संसर्ग अटोक्यात राहू शकतो अस मत काही तज्ञांनी या बैठकीत मांडलं आहे.

राज्यातील टास्क फोर्सची oक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांसोबत महत्त्वाची बैठकीचा एकूण आढावा मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर केला जाणार आहे. त्यानंतर ओमिक्रॉनच्या संसर्गाला थोपवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आणि कोणते निर्बंध पुन्हा लागू करावेत यावर निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com