अधिवेशनाच्या संभ्रमात विधिमंडळ कर्मचारी भरतीप्रक्रिया रखडली

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter session nagpur) ७ डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे सुरु होणार असल्याचे यापूर्वी जाहीर केलं आहे.
winter session nagpur
winter session nagpursarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने संभ्रम वाढला आहे. अधिवेशन काळात होणारी कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली आहे. अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा (Legislative Staff Recruitment) पुढे ढकलण्यात आली आहे.

''संबधित पदाच्या मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी,'' असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे. अधिवेशन नागपुरात झाले तर अधिकाऱ्यांची खूप धावपळ होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी कुठलीही तयारी अद्याप झालेली नाही.

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter session nagpur) ७ डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे सुरु होणार असल्याचे यापूर्वी जाहीर केलं आहे. अधिवेशन कालावधीसाठी सविचालयात लिपीक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरण्यासाठी उमेदवारांची आवश्यकता असल्यामुळे इच्छूक उमेदवारांची आवश्यतेनुसार 26 व 27 रोजी विधान भवन नागपूर येथे कक्ष क्र. 1 मध्ये उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम लवकतच कळविण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी सांगितले.

winter session nagpur
ST strike: आमच्या नावानं पावत्या कोण फाडतयं!

प्रथा-परंपरेप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. पण मुख्यमंत्र्यांची तब्बेत बरी नसल्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याची शक्यता आहे. अधिवेशन मुंबईतच व्हावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारचे नेते आग्रही आहेत, तर हे अधिवेशन नागपुरातच व्हावे, यासाठी भाजचे नेते आग्रही आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होऊन घरी येतील असं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकतेच स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी काही सल्ला दिला आहे. त्या सल्ल्यांचं ते पालन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com