Women Commission Action on Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर बोलणाऱ्या अंजली भारतीला दणका; महिला आयोगाकडून 24 तासांच्या आत कारवाई

women commission notice Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यामुळे अंजली भारतीला महिला आयोगाचा दणका, 24 तासांत कारवाईचे आदेश.
Women Commission Action on Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर बोलणाऱ्या अंजली भारतीला दणका; महिला आयोगाकडून 24 तासांच्या आत कारवाई
Published on
Updated on

भंडारा जिल्ह्यातील अशोक नगर येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात गायिका व निवेदिका अंजली भारती हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप अंजली भारतीवर करण्यात आला आहे. भारती यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवर सरकारकडून योग्य कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना अंजली भारतीने संताप व्यक्त केला. मात्र, या संतापाच्या भरात तिने वैयक्तिक पातळीवर जाऊन अमृता फडणवीस यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरल्याचा आरोप आहे. तिच्या वक्तव्यावरून भाजप पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. सोशल मीडियावरूनही अंजली भारतीवर जोरदार टीका सुरू आहे.

Women Commission Action on Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर बोलणाऱ्या अंजली भारतीला दणका; महिला आयोगाकडून 24 तासांच्या आत कारवाई
Shiv Sena Split : शिवसेनेत पुन्हा फूट? पुन्हा बंडाची शक्यता; बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा खासदारांचा दावा

भंडाऱ्यात आयोजित भीम मेळाव्यात अंजली भारती प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होती. महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि आरोपींवर कठोर शिक्षा न होण्याबाबत बोलताना तिने आक्रमक भूमिका घेतली. मात्र, या भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण मुद्दा भरकटल्याचे चित्र दिसून आले. या प्रकरणी तिच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.

या वादाची गंभीर दखल घेत आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले असून सार्वजनिक कार्यक्रमात एखाद्या महिलेबाबत अपमानास्पद शब्द वापरणे, तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे आणि सन्मानाला धक्का पोहोचवणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात नागपूर विभागीय आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तात्काळ व कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

Women Commission Action on Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर बोलणाऱ्या अंजली भारतीला दणका; महिला आयोगाकडून 24 तासांच्या आत कारवाई
Depti Chaudhary suicide case : 6 वर्षे सहन का केलं? लढायला हवं होतं! आता दीप्ती जिवंत असती! संतप्त महिलांना रुपाली चाकणकरांचा खडा सवाल

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत महिलांना संविधानाने दिलेल्या हक्कांचे संरक्षण करणे हे आयोगाचे प्रमुख कर्तव्य आहे. महिलांच्या सन्मानाला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वक्तव्यावर कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तात्काळ आयोगाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com