आम्हीही दररोज खोटे पुरावे सादर करू शकतो! यास्मीन वानखेडेंचा दावा

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांना आता त्यांच्या भगिनी यास्मीन वानखेडे यांनी उत्तर दिले आहे.
Yasmeen Wankhede
Yasmeen Wankhede

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मीन वानखेडे (Yasmeen Wankhede) यांनी उत्तर दिले आहे.

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना यास्मीन वानखेडे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. वानखेडे कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, एका अधिकाऱ्याचा जन्मदाखला बघणारे नवाब मलिक हे कोण आहेत? त्यांचे शोधपथक मुंबईतून पोस्ट केलेल्या फोटोला दुबईतील दाखवते. आम्हाला ठार मारण्याचा धमक्या येत आहेत. मला तर वाटते की मी सुद्धा दररोज खोटे पुरावे सादर करावेत.

Yasmeen Wankhede
वानखेडेंची चौकशी अद्याप नाहीच! एनसीबीच्या उपमहासंचालकांनीच दिली माहिती

समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. तुम्हाला खरी माहिती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जा आणि तपासा, असेही समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते.

Yasmeen Wankhede
वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या प्रभाकर साईलचा आणखी एक गौप्यस्फोट

नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विट केला होता. समीर दाऊद वानखेडे यांचा इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा), असे ट्विट त्यांनी केले होते. वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही मलिक यांनी शेअर करत पेहचान कौन ? असे ट्विट केले होते. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखडे यांच्या जन्माचा दाखला ट्विट केला होता. या जन्म दाखल्यावर नावाच्या रकान्यात समीर दाऊद वानखडे असे लिहिण्यात आलेले आहे. मलिक यांनी समीर वानखेडेंचा आणखी एक फोटो टि्वट केला होता. या फोटोत एक महिला व अन्य जण दिसत आहे. वानखेडे यांच्यासोबत असलेली महिला ही डॉ. शबाना कुरेशी असल्याचे समजते. तिच्यासोबत समीर वानखेडे याचं पहिलं लग्न झालं असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com