बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नमिता मुंदडा यांनी नेकनूर येथील चातुर्मासा निमित्त सुरु असलेल्या शिवपुजन सोहळ्यास भेट दिली. यावेळी महिलांनी मंगळागौरीचा फेर धरलेला होता. पाहुण्या म्हणून आलेल्या नमिता मुंदडांना महिलांनी आग्रह करताच त्यांनीही मंगळागौरीचा फेर धरला.
नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांपासून केजमधून विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी करत आहेत. स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी उत्तीर्ण, वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेले अशा यशस्वीतांचे सत्कार, शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांचे सत्कार अशा निमित्ताने त्यांचा वैयक्तीक संपर्कावर भर आहे.
तर, लग्नसमारंभ, हरिनाम सप्ताह, वाढदिवस, महापंगत अशा सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावून त्या संपर्क वाढवित आहेत. मतदार संघातील निमंत्रण असलेल्या कुठल्याही सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांना हमखास हजेरी असतेच. दरम्यान, नेकनूर येथे सेलूकर महाराज यांचा शिवपुजन सोहळा सुरु आहे. या ठिकाणीही त्यांना निमंत्रण आले.
मंगळवार असल्याने शिवपुजन सोहळ्याला उपस्थित महिलांनी मंगळागौरीचा फेर धरला होता. याच वेळी नमिता मुंदडाही तिथे पोचल्या. महिलांनी नमितांना सहभागाचा आग्रह करताच सर्व उत्साही वातावरण पाहून त्यांनीही मग मंगळागौरीचा फेर धरला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.