Ashok Chavan : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी शिंदे-फडणवीसांचे मानले आभार..

Maharashtra Politics : या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.
Congress Leader Ashok Chavan
Congress Leader Ashok Chavan Sarkarnama

Maharashtra Politics : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या (Jalna Nanded Expressway) भूसंपादनासाठी काढलेल्या आदेशानंतर चव्हाणांनी हे टि्वट केलं आहे. या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे. अनेक मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार असल्याचं सांगत चव्हाणांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Congress Leader Ashok Chavan
Shinde Government : गद्दारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर' हे लिहितील : शिवसेनेच्या तिन्ही 'संजय' मध्ये जुंपली !

बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Mumbai Nagpur Samruddhi Express Way) विस्तारित प्रकल्प म्हणून जालना-नांदेड द्रुतगती जोडमहामार्ग उभारण्याची संकल्पना महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात अशोक चव्हाण यांनी मांडली होती. या संकल्पनेला ठाकरे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या (Jalna Nanded Expressway) भूसंपादनासाठी २,८८६ कोटी, विरार-अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्पासाठी २२,२२३ कोटी तर पुणे रिंग रोडसाठी १०,५२० कोटी असा एकूण ३५,६२९ कोटी रुपयांचा निधी हुडको व इतर वित्तीय संस्थांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  • या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या पूर्वेकडील परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार आहे.

  • औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाण्यासाठी खर्च होणारा पैसा व वेळेत मोठी बचत होणार आहे.

  • या प्रकल्पाचा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्व घटकांना लाभ होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com