एसटीला सोन्याचे दिवस; दसरा मेळाव्याच्या बुकिंगसाठी शिंदे गटाकडून १० कोटी कॅश

Eknath Shinde Politics|Dasara Melava| राज्यभरातून लाखो कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
Eknath Shinde Politics|
Eknath Shinde Politics|

Shinde group Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरातून लाखो कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. शिवतीर्थावर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा (Shinde Group ) मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा निमित्ताने दोन्ही गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

असे असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे शिंदे गटाने 3 हजाराहून अधिक एसटी बसेसचे  बुकींग केले असून त्यासाठी एसटी महामंडळाला तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहे. पण या दसरा मेळाव्यामुळे मात्र एसटी महामंडळाची मात्र दसऱ्यालाच दिवाळी झाली आहे.

Eknath Shinde Politics|
Pankaja Munde : शिदोरी बांधून, शांततेने, वेळवर भगवान भक्तीगडावर या..

मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून तब्बल 4 हजार एसटी बसेस बुकिंग करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात मात्र तीन हजारहून अधिक एसटी बसेसचे बुकींग झाले आहे. बसेस बुकिंगसाठी शिंदे गटाने तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहेत. त्यासाठी तब्ब्ल दोन दिवस पैसे मोजणी सुरु होती. दसऱ्याला पहिल्यांदाच इतकी मोठी बुकींग करण्यात आल्यांच एसटी महामंडळाच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यात कोणताही प्रकारचा पक्ष प्रवेश होणार नसल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, व्यासपीठावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला येऊ न देण्याची खबरदारीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन पक्ष प्रवेश दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दसरा मेळाव्याच्या पुर्वसंध्येला राज्यभरातून लांब पल्ल्याच्या गाड्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. जालना, औरंगाबाद, विदर्भातून दसरा मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com