Bhiwandi's NCP Corporator Disqualified : मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; भिवंडीचे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक अपात्र

नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
Bhiwandi's NCP Corporator
Bhiwandi's NCP CorporatorSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News : राज्यातील सत्ताबदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या भिवंडीतील १८ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय नगरविकास विभागाचे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीला मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे. (18 corporators of NCP in Bhiwandi disqualified; Chief Minister's decision)

काँग्रेस पक्षाचे (Congress) माजी उपमहापौर नगरसेवक अहमद सिध्दीकी, मतलुब सरदार खान,मलिक मोमीन, अर्षद अन्सारी, अंजुम सिद्दिकी, जरीना अन्सारी,शबनम अन्सारी, नमरा औरंगजेब अन्सारी यांच्यासह १८ नगरसेवकांचा त्यात समावेश आहे.

Bhiwandi's NCP Corporator
NCP Leader Warn To Bhalke : भगीरथ भालके विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो; राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांचा इशारा

दरम्यान, भिवंडी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला होता. पालिकेत काँग्रेस पक्षाचे बहुमत असतानाही नामुष्की ओढवल्याने १८ फुटीर नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. आयुक्तांकडे सुनावणी सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला होता.

Bhiwandi's NCP Corporator
KCR's Minister Meet BJP Leader : केसीआरच्या तीन मंत्र्यांनी घेतली सोलापुरातील भाजप नेत्याची भेट; बंद खोलीत अर्धा तास चर्चा!

कोकण विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सुनवणीमध्ये १८ माजी नगरसेवकांच्या बाजूने निकाल लागला होता. त्याविरोधात जावेद दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढले. यामध्ये कोकण आयुक्तांचे आदेश रद्द करत १८ माजी नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र महापालिका सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ कलम ३ (१) (ब) अन्वये मुख्यमंत्री शिंदे यांनी ही अपात्रतेची कारवाई केली आहे. या नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०२१ पासून पुढे ६ वर्षांसाठी आपत्र ठरविण्यात आलेले आहे.

Bhiwandi's NCP Corporator
CM Visit To Pandharpur : कलेक्टर, मी कुणालाही सोडणार नाही; हार्ड ॲक्शन घेईन; पंढरपुरात पाणी नसल्याने मुख्यमंत्री संतापले

राष्ट्रवादीचे नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी या प्रवेशावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या या १८ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करत राष्ट्रवादी आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा दणका दिल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com