मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) प्रकरणातील कुख्यात गुंड अबू सालेमची (Abu Salem) 25 वर्षांची शिक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. सालेमने त्याच्या जन्मठेपेविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. त्याची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. (Abu Salem latest news)
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेमला दिलेली शिक्षा योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे, त्यामुळे सालेमला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. आज त्याचा याचिकावर न्यायालयानं निकाल दिला. सालेमने २०२७ मध्ये त्यांची सुटका व्हावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे.
सालेम हा पोर्तुगालमध्ये तीन वर्ष कारागृहात होता. सालेम याची २५ वर्षांची शिक्षा १० नोव्हेंबर २०३० मध्ये पूर्ण होत आहे.सुप्रीम कोर्टानं ५ मे रोजी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर अबू सालेम पोर्तुगालला (Portugal) पळून गेला. नंतर 2002 मध्ये त्याला पोर्तुगालमधून अटक करण्यात आली. तिथे त्याच्यावर तीन वर्ष खटला चालल्यानंतर पोर्तुगाल कोर्टाने त्याला भारतात (India) परत नेण्याची परवानगी दिली.
पोर्तुगाल सरकारने जर अबू सालेम दोषी आढळला, तर त्याला त्यांच्या कायद्यांप्रमाणे शिक्षा द्यावी अशा अटी घातल्या. यामध्ये अबू सालेमला फाशी देता येणार नाही आणि अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षांची शिक्षा देता येईल असे सांगण्यात आले होते. पोर्तुगालसोबतच्या या कराराचा वापर करत अबू सालेमने जन्मठेपेविरोधातील याचिका सुप्रिम कोर्टात दाखल केली होती.
"मी अबू सालेम नाहीच," असा दावा ही त्याने केला होता. 2005 मध्ये त्याला भारतात आणण्यात आलं. अबू सालेमला भारताच्या स्वाधीन करताना, पोर्तुगाल आणि भारत यांच्यात हस्तांतरण करार झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.