Maharashtra Legislature: टीम इंडियातील चार खेळाडू विधिमंडळाच्या 'मैदानात' ; विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये स्वागतासाठी रस्सीखेच

T20 world champion team india 4 mumbaikar players felicitation: राजकारण्यांच्या हा आखाड्यात आता T20 च्या विश्वविजेत्या यांची दमदार एन्ट्री होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्यासह चौघेजण विधान भवनाच्या आवारात दाखल होणार आहेत.
T20  world champion team india
T20 world champion team indiaSarkarnama
Published on
Updated on

T20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियामधील चार खेळाडू आज विधिमंडळाच्या 'मैदानात' येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ आवारात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर विरोधकांनी टीका केली आहे. या खेळाडूंचे सत्ताधारी अन् विरोधक,कसे स्वागत करतात, याची उत्सुकता आहे.

विधिमंडळाच्या आखाड्यात अर्थात विधानसभेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून पहिल्याच तासापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडत आहेत. एकमेकांची उणी धुणी काढत आहेत. लोकसभा निवडणुकीतील यश-अपयशावरुन एकमेकांना हिणवत आहेत. यातून हे अधिवेशन चर्चेत आले आहे.

राजकारण्यांच्या हा आखाड्यात आता T20 च्या विश्वविजेत्या यांची दमदार एन्ट्री होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळात जय्यत तयारी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह चौघेजण विधान भवनाच्या आवारात दाखल होणार आहेत.

खेळाडूंच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या आवारात सत्ताधाऱ्यांतील आमदारांनी बॅनरबाजी केली आहे. यावर विरोधक आमदारांनी टीकास्त्र सोडले आहे. टीम इंडिया संपूर्ण भारतीयांची आहे. ते विधिमंडळात येत असले, तरी ते सर्वांचे आहेत. त्यानुसारच बॅनर लागले पाहिजे होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी बॅनरवरून टीम इंडियाचे फोटो हटवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावले आहेत. हे बॅनरबाज सरकार असल्याची, टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

T20  world champion team india
Maharashtra State Assembly: T20 च्या पोस्टरबाजीवरून रोहित पवार-सरनाईकांमध्ये जुंपली; सत्ताधारी-विरोधक येणार आमने सामने

या टीकेला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार आत्ताच राजकारणात आले आहेत. क्रिकेटच्या मैदानाचे ते राजकीय नेतृत्व करत असले, तरी त्यांना क्रिकेटमधलं अजून बरंच काही समजून घ्यायचा आहे, असा टोला लगावला.

आम्ही सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्रामध्ये घडत आहे. सर्व आमदारांनी त्यांच्या स्वागतासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. खेळाडू येण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादावरून जुंपली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com