Milk Adulteration News: दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता थेट...

State Govt : दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला
State Govt
State GovtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेणार आहे.

अशा पद्धतीची समिती यापुढे प्रत्येक जिल्हा पातळीवर नेमण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यास सरकारला यश येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दूध भेसळ रोखण्याबद्दल सरकार अ्ॅक्शन मोडवर आलं आहे.

State Govt
Mp Jadhav On Kendrekar News : सरकारला चांगल्या अधिकाऱ्यांची किंमत नाही, म्हणून केंद्रेकरांना घालवण्याची घाई..

दूध भेसळ रोखण्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन आणि इतर विभागातील अधिकारी सदस्य असणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबण्यात येणार आहे.

दरम्यान, भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून भेसळयुक्त दूध घेणाऱ्यांविरोधात देखील सह आरोपी म्हणून आता कारवाई करण्यात येणार आहे. याबरोबरच या समितीने केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.

State Govt
Nashik ACB Trap: नाशिकमध्ये मोठी खळबळ; बडा अधिकारी 40 लाखांच्या लाचेप्रकरणी 'एसीबी'च्या जाळ्यात

दरम्यान, दिवसेंदिवस भेसळयुक्त दूधाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. भेसळीच्या दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीप परिणाम होतो. त्यामुळे अशा भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर आता थेट कारवाई होणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com