Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे 'इंडिया'च्या मोहिमेला धार चढवणार; मुंबईत मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक

Congress News : मोदी-शहांविरोधात उभारलेल्या 'इंडिया'च्या मोहिमेला आणखी धार चढणार आहे.
Published on

MahaVikas Aghadi News : मोदी-शहांविरोधात उभारलेल्या 'इंडिया'च्या मोहिमेला आणखी धार चढणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीचा प्राथमीक अजेंडा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अवर्जून हजेली लावणार आहेत. 'इंडिया'च्या बैठकीचे नेतृत्व ठाकरे यांच्याकडे असल्याने आता पासूनच ते तयारीला लागले आहेत.

भाजपच्या (BJP) विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटण्यामध्ये झाली होती. त्या बैठकीला देशातील १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक बैंगळुरुमध्ये झाली. या बैठकीला २६ पक्षाच्या नेत्यांनी हजरेली लावली होती. या बैठकीमध्येच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी आघाडीला 'इंडिया' असे नाव दिले. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' ची पुढची बैठक मुंबईत होणार आहे.

Uddhav Thackeray News
Raj Thackeray On Gadkari : राज ठाकरेंच्या निशाण्यावर पहिल्यांदाच गडकरी; 'टोलनाक्या'च्या तोडफोडीवरून भाजप - मनसेत घमासान

महाराष्ट्रातून विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहभागी झाले होते. यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीची जबाबदारी ही महाराष्ट्रातील नेत्यांवर असणार आहे. बैठकीची रणनीती ठरवण्यासाठी आघाडीची विशेष बैठक मंगळवारी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर आघाडीची पहिलीच बैठक असणार आहे.

Uddhav Thackeray News
Vijay Darda Convicted: माजी खासदार विजय दर्डा व मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांची शिक्षा !

त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह विरोधकांच्या मुद्यांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असल्यामुळे त्यावरही चर्चा होऊ शकते. दरम्यानच्या, काळात आघाडीच्या राज्यातील सभा थांबल्या होत्या, त्या संदर्भातही बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असला तरीही विरोधीपक्ष नेत्याची निवड झालेली नाही. यामुळे महाविकास आघाडीच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com