वानखेडेंची कबुली; होय, बहिणीकडे ड्रग्ज पेडलर गेला होता, पण...

सलमान नावाचा एक ड्रग्ज पेडलर माझ्या बहिणीला भेटल्याचे वानखेडे म्हणाले.
Jasmine Wankhede and Sameer Wankhede
Jasmine Wankhede and Sameer Wankhede

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मंगळवारी गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी आणि वानखेडे यांची बहीण जास्मिन (Jasmine Wankhede) यांच्यातील व्हॉट्स अॅप चॅट मलिकांनी उघड केले आहेत. यामध्ये केससंदर्भात चर्चा केली जात असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनीही कबुली दिली आहे. सलमान नावाचा एक ड्रग्ज पेडलर माझ्या बहिणीला भेटल्याचे ते म्हणाले. पण माझी बहीण एनडीपीएसची प्रकरणे लढत नसल्याने तिने त्याला परत पाठवले, असंही वानखेडे यांनी स्पष्ट केलं. एका मध्यस्थाच्या माध्यमातून सलमान आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या तुरूंगात आहे, असंही वानखेडे यांनी सांगितले.

Jasmine Wankhede and Sameer Wankhede
देवेंद्रजी, पंधरा कोटींच्या 'त्या' पार्ट्यांचा आयोजक कोण? मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

मलिकांनी व्हॉट्स अॅप चॅट उघड करत खोटे आरोप केल्याचेही वानखेडे म्हणाले. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मध्यस्थाने या वर्षीच्या सुरूवातीला मुंबई पोलिसांकडे एक तक्रारही केली होती. पण त्यातून काहीच समोर आले नाही. त्यानंतर सलमानसारखे काही पेडलर्स माझ्या कुटूंबाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे प्रयत्न सुरू असून यामागे ड्रग्ज माफियांचा हात असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला आहे.

महागड्या कपड्यांबाबत मलिकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरही वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या महागड्या कपड्यांबाबत केवळ अफवा आहेत. त्यांना याबाबत कमी माहिती आहे. अशा गोष्टी ते शोधू शकतात, असं प्रत्युत्तर वानखेडे यांनी मलिकांना दिले.

मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले. वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांची वसूली केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या कोटची चर्चा आधी होती. पण वानखेडे हे मोदींच्या पुढचे निघाले. त्यांच्या शर्टची किंमत 70 हजार रुपये, पँटची किंमत एक लाखांची तर बुट दोन लाखांचे असते. ते वापरत असलेले घड्याळही काही लाखांचे आहे. ते दररोज नवीन कपडे घालत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com