Mumbai Shivsena News : ठाकरेंचा एक फोन अन्‌ कातेंनी शिंदेंची ऑफर फेटाळली...

Tukaram Kate तुकाराम काते हे उद्धव ठाकरे गटाचे अनुशक्ती विधानसभेचे माजी आमदार आहेत.
Eknath Shinde, Udhav Thackeray, Tukaram Kate
Eknath Shinde, Udhav Thackeray, Tukaram Katesarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai Shivsena News : उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटण्यास गेले आणि त्यांनी त्यांची मनधरणी केली. तसेच उद्धव ठाकरेंशीही त्यांची फोनवरून चर्चा झाली. ठाकरेंच्या एका फोनवरून श्री. कातेंनी शिंदे गटाची ऑफर फेटाळली.

तुकाराम काते Tukaram Kate हे उद्धव ठाकरे Udhav Thackeray गटाचे अनुशक्ती विधानसभेचे माजी आमदार आहेत. मध्यंतरी कुर्ला येथील एका हायस्कुलच्या कार्यक्रमात ते शिंदे गटाच्या आमदारांसोबत सहभागी झाले होते. त्यामुळे ते शिंदे गटात गेले काय, अशी चर्चा उठली होती.

याबाबत ते शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे श्री. काते ठाकरे गट सोडून जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, आज तुकाराम काते हे शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणार होते. पण, ठाकरे गटातील त्या विभागातील प्रमख पदाधिकारी श्री. काते यांना भेटण्यासाठी गेले.

त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस श्री. काते यांची उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. तसेच सोमवारी मातोश्रीवर भेटी संदर्भात निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे कातेंची मनधरणी करण्यात ठाकरे गटातील नेत्यांना यश आले आहे.

Edited By Umesh Bambare

Eknath Shinde, Udhav Thackeray, Tukaram Kate
I.N.D.I.A.'s Mumbai Meeting: 'इंडिया'च्या 'डिनर'मध्ये मराठी संस्कृती; पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाववर नेते मारणार ताव..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
TOP-Ten-News-1
dharashiv shivsena
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com