Aaditya Thackeray News: मेधा किरीट सोमय्या यांनी शिवसेना (यूबीटी) संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल दंडाधिकारी माझगाव महानगर न्यायालायने संजय राऊत यांना दोषी ठरवले.
त्यावर प्रतिक्रिया पत्रकारांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे एका वाक्यात विषय संपवला आदित्य ठाकरे म्हणाले, 'संजय राऊतसाहेब हे लढणारे नेते आहेत. ते कशाला घाबरत नाहीत ते उत्तर देतील.'
बुधवारी (ता.25) झालेल्या पावसामुळे मुंबई, पुणे शहरातील रस्ते जलमय झाले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. यासाठी आदित्य ठाकरेंनी सरकारला जबाबदार धरले. ठाकरे म्हणाले, खड्डे मुक्त करणार म्हणणाऱ्यांनीच सगळीकडे खड्डे खोदून ठेवले आहेत. शहर तुंबत असताना पालिकेचा एकही अधिकारी रस्त्यावर नव्हता.
यांच्या कंत्राटदारांनी, खोक्यांनी आमचा महाराष्ट्र लुटला आहे. सरकारचे कंत्राट, खोक्यांना प्राधान्य आहे. मोदी मेट्रोच्या उद्घाटनासाठी सहाव्यांदा पुण्यात येणार होते. पावसामुळे त्यांचे येणे रद्द झाले. मात्र त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे पुणे भारतातच आहे. म्हणजे ते येणार नाहीत.
घटनाबाह्य मुख्यमंत्री कोणत्या तरी कार्यक्रमात बोलत होते की आम्ही मुंबईत असे काम केले ती ती तुंबत नाही. आणि त्यांच्या या दाव्याच्या अर्धा तासातच मुंबई तुंबली. खोके आणि कंत्राटांच्या पलिकडे यांना काही दिसत नाही, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.