Ajit Pawar & Abdul Sattar News : अजित पवारांनीच अब्दुल सत्तारांना एका झटक्यात माजी कृषिमंत्री करून टाकले

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीतील बंडखोर आमदारांनी नव्या सत्तेत विरोधकांवर रोजच जहरी टीका केली.
Ajit Pawar, Abdul Sattar
Ajit Pawar, Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिंदे फडणवीस सरकारमध्ये आपण बाहुबली आहोत या थाटात वावरलेल्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळेंपासून विरोधी नेत्यांवर आणि वरिष्ठ अधिकार्यांवर नको त्या भाषेत बोलणारे माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अल्पसंख्याक मंत्री हे आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रडारवर होतेच. सत्तारांचं वागणे, बोलणे डोक्यात ठेवलेल्या अजितदादांनी सत्ता येताच सत्तारांकडील महत्वाचे कृषी खातं काढून, त्यांचा असाच हिशेब चुकता केल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साथीतील बंडखोर आमदारांनी नव्या सत्तेत विरोधकांवर रोजच जहरी टीका केली. त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, अजित पवार यांच्या नावानेच बोट मोडत शिंदेंच्या नेत्यांनीच राजकारण तापवले. अजित दादांच्या वर्किंग स्टाईलवर सारेच तुटुन पडत होते.

Ajit Pawar, Abdul Sattar
Ajit Pawar Mantralaya Meeting: अजित पवारांनी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावलं..; बैठकांचा सपाटा सुरु..

त्यात कृषिंमंत्री असलेले अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आघाडीवर होते. विरोधकांवर तुटुन पडतानाच सत्तारांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली. खासदार सुप्रिया सुळेंवरील त्यांचे विधान वादग्रस्त ठरुन स्वपक्षीयांसह विरोधकांच्या निशाण्यावर आले. सुळेंना बोलणार्या सत्तारांना अजितदादांनी सभांमधून झोडपून काढले. याच वादात सत्तार अजित पवारांच्या रडारवर होते,

तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांनी विधानसभेत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला होता. वाशिम जिल्ह्यातील एका गायरान जमिनीच्या प्रकरणात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. खुद्द न्यायालयानं सत्तार यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. मात्र, यावेळी त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धावून आले होते.

Ajit Pawar, Abdul Sattar
Cabinet Expansion : अजित पवारांनी नऊ वजनदार खाती हिसकावली; तरीही भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडूंचे डोळे राजभवनाकडेच

आता सत्तेत येताच अजित पवारां(Ajit Pawar)नी खातेवाटपाच्या बैठकीत हेरुन अब्दुल सत्तारांकडे असलेलं कृषी खातं आपल्या गटाकडे मागवून घेतलं. आता खातेवाटपानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं गेलं आहे. यामुळे अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डोक्यात गेलेल्या सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com