Abhishek Ghosalkar Death : 'कोल्ड ब्लडेड मर्डर' अगोदर हसत एकत्र बसून फेसबुक लाईव्ह अन् नंतर...

Abhishek Ghosalkar News : जाणून घ्या, फेसबुक लाईव्हमध्ये दोघेही नेमकं काय म्हणाले?
Abhishek Ghosalkar
Abhishek GhosalkarSarakarnama
Published on
Updated on

Abhishek Ghosalkar and Morris : मुंबईतील दहिसरमध्ये गुरुवारी थरारक घटना घडली. ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, विशेष म्हणजे यानंतर मॉरिसने स्वत: देखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ही घटना घडण्याअगोदर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर फेसबुक लाईव्ह केले होते. ज्यामध्ये दोघेही हसून बोलत होते. अभिषेक घोसाळकर हे अगदी शांतपणे बोलत होते, पुढे काय होईल याची त्यांना जराही कल्पना नव्हती. तर या फेसबुक लाईव्हमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं हे पाहूयात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar : मोठी बातमी! फेसबुक लाइव्हमध्ये गोळीबाराचा थरार, अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू

फेसबुक लाईव्हमध्ये सुरुवातील मॉरिस सर्वांना उद्देशून म्हणतो, 'गॉड ब्लेस्ड यू ऑल... आणि त्यानंतर मग अभिषेक घोसाळकरही सर्वांना येस्स गॉड ब्लेस्ड यू असं म्हणतात. यावेळी दोघेही हसताता, यानंतर मॉरिस अभिषक यांना तुम्ही बोला असं सांगतो. अभिषेक म्हणतात, मला वाटतं आम्ही दोन-तीन कारणांमुळे फेसबुक लाईव्ह आलो आहोत. एकतर मॉरिसभाईबरोबर फेसबुक लाईव्ह येण्याची आज संधी मिळाली आहे. माझ्या मते खूप जणांना आश्चर्याचा धक्का बसेल.'

यानंतर मॉरिस म्हणतो, 'होय खूप जणांना आश्चर्य वाटले. पण जी गोष्ट आज एकजुटीसाठी होते. जी आयसी कॉलिनीच्या चांगल्यासाठी होत आहे. जर आम्ही एकत्र आलो आणि नागरिकांसाठी काहीतरी चांगलं केलं, तर आशीर्वादही मिळतील. आम्ही ठरवलं आहे की, साड्या वाटणार आहोत, रेशन वाटणार आहोत. अभिषेकभाई आणि मी एकत्र येऊन, नाशिकसाठी बसव्यवस्था केली.'

यानंतर अभिषेक म्हणतात, 'एक चांगला दृष्टिकोन घेऊन आणि एकजुटीने आम्हाला चांगलं काम करायचं आहे. यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मला वाटतं हे नवीन वर्ष आहे आणि आपल्याला ते साजरं केलं पाहीजे. मला वाटतं की एक चांगला हेतू घेऊन आपल्याला पुढे जायला हवं. लोकांचं कल्याण व्हावं यासाठी आणि लोकांना सोबत घेऊन आपण पुढे जावं. लोकांचा फायदा कशात आहे, ते पाहून काम करावं. मला वाटतं एक चांगला निर्णय मॉरिसभाईने घेतला आहे, की आज साड्या आणि धान्य वाटण्याचं काम केलं जात आहे.'

Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar News : मुंबई पुन्हा हादरली! ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; चार गोळ्या लागल्या

मॉरिस म्हणतो, 'आम्ही हे एकत्रितपणे करत आहोत आणि अभिषेक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत आणि मला वाटतं देवाच्या कृपने काहीतरी चांगलं घडेल. अभिषेकभाई मार्गदर्शन करतील की आम्ही पुढे काय करावं. अभिषेकभाई दोन मिनिटं बोलतील.'

यानंतर पुढे अभिषेक म्हणतात 'आम्ही जवळपास ३०० पेक्षा अधिक कामगार महिलांना साडी वाटप करणार आहोत आणि जे गरजू नागरिक आहेत, त्यांना मदत करणार आहोत. तसेच आम्ही १० फेब्रुवारीपासून मुंबई ते नाशिक बसही सोडणार आहोत आणि नाशिक ते मुंबई. त्याचीही तयारी चांगल्याप्रकारे सुरू आहे. जसं की आम्ही म्हणालो एकत्र आलो आहोत तर चांगलं काम करू. लोकांची सेवा करू आणि आयसी कॉलनी असेल बोरीवली असेल, गणपत पाटील नगर आणि आसपासचा परिसर असेल या ठिकाणच्या लोकांची चांगल्याप्रकारे सेवा करून दाखवू.'

पुढे मॉरिस म्हणतो 'हे खूप महत्त्वाचं आहे की, जे काही आम्ही करू ते नागरिकांसाठी करू. नागरिकांच्या हितासाठी करू. अभिषेकभाई हे खूप व्यस्त आहेत, ते उद्या निघणार आहेत. तरीही त्यांनी इथे वेळ दिला.' यानंतर शेवटी अभिषेक म्हणतात, पुढे चालून आणखी खूप काही करायचं आहे, ही तर केवळ सुरुवात आहे. एक चांगली सुरुवात होत आहे आणि असंच काम करत राहू. यानंतर जेव्हा अभिषेक बाहेर जाण्यासाठी उठतात तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com