मुंबई पोलिसांवर नामुष्की; अमली पदार्थ विरोधीच्या कर्मचाऱ्यांनी मागितली पानवाल्याला लाच

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ पथकावर मोठी नामुष्की ओढवली आहे.
Police
Police Sarkarnama

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा वाद सुरू असताना आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ पथकावर मोठी नामुष्की ओढवली आहे. पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी पान टपरीचालकाकडून लाच मागितल्याचे समोर आले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी पान मसाला विक्रेत्याकडे गुटखा आणि पान मसाल्याचा धंदा सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये लाच मागितली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस शिपाई बाबासाब मधु सांगोलकर व पोलिस हवालदार इक्बाल बशिर शेख यांचा समावेश असून हे दोघेही नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत आहेत.

Police
वाढता वाढता वाढे! ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल, डिझेल 20 वेळा महागलं

या प्रकरणातील तक्रारदार मोहम्मद फैज निजामुद्दीन सय्यद हा सीवूड्स येथील रहिवासी आहे. त्याचा पान मसाला व गुटखा विक्रीचा व्यवसाय आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या पथकातील पोलीस कर्मचारी सांगोलकर आणि शेख तिथे पोचले. त्यांनी मोहम्मद फैज याला पान मसाल्याचा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा १५ हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले होते. यामुळे मोहम्मद फैज याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

Police
अभिनेत्रीनं राजकीय इनिंग सुरू केली अन् म्हणाली, आयुष्याची खूप सुंदर सुरवात!

समीर वानखेडेंची खातेनिहाय चौकशी

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी आहेत. साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com