नाना पटोलेंवर वळसे पाटील नक्की कारवाई करणार : भाजप आमदाराचा दावा

Congress|Nana Patole|Dilip Valse-Patil|BJP : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला दिले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse Patil) यांनी मुंबई भाजप (BJP) अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना दिले आहे. पटोलेंवर कारवाईची मागणी पत्राद्वारे लोढा यांनी गृहमंत्री वळसे-पाटलांकडे केली होती. त्यावर पाटलांनी लोढांना पत्राद्वारे उत्तर देत पाठवलेल्या पत्राची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Nana Patole
शिवसेना आमदाराला मुंबईत घर घेण्यासाठी राष्ट्रवादीने केले भीक मागो आंदोलन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पटोलेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे पटोलेंवर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मोदी यांच्याबद्दल पटोले वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. यासाठी लोढांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले होते. साखळी उपोषण सुरू असताना पोलिसांनी लोढा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती. त्यावेळी वळसे-पाटीलांची भेट घेऊन पटोलेंवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे लोढांनी सांगितले आहे.

Nana Patole
उद्धव ठाकरेसाहेब; टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा !

लोढांनी पटोलेंवर कारवाईसाठी गृहमंत्री वळसे-पाटीलांना पाठवलेल्या निवेदनास वळसे पाटीलांनी उत्तर दिले असून पटोलेंवर आपण पाठवलेल्या पत्राची तपासणी करून योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबतची माहिती लोढा यांनी प्रसिद्धीस दिली आहे. दरम्यान, काही महिन्याआधी पटोले यांनी 'आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो,' व ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं, असे वाद्‌ग्रस्त विधान केले होते. यावरून भाजपने पटोलेंवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com