Mumbai Bangladeshi : बांगलादेशींमुळे सुरक्षा धोक्यात, घुसखोरांच्या 'हिट लिस्ट'वर मुंबई

Actor Saif Ali Khan After attack police intensified Bangladeshis infiltrated Mumbai : बांगलादेशींची देशात घुसखोरी वाढली असून आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 11 महिन्यात 156 बांगलादेशींना हद्दपार केले आहे.
Mumbai
MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात घुसून घुसखोर बांगलादेशीने जीवघेणा हल्ला केला. यानंतर मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशींविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मुंबई पोलिसांनी गेल्या 24 तासांत 20 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. तर गेल्या 11 महिन्यात 156 बांगलादेशींना हद्दपार केले आहे. या कारवाईनंतर बांगलादेशींना घुसखोरी करण्यासाठी आणि लपून राहण्यासाठी मुंबई अधिक सोपी असल्याचे समोर आहे. एकप्रकारे घुसखोऱ्यांच्या 'हिट लिस्ट'वर मुंबई आहे. यासाठी सीमारेषेवर दलाल कार्यरत असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी निघाल्याने बांगलादेशींविरुद्धच्या कारवाईला आणखी वेग आला आहे. मुंबई (Mumbai) पोलिसांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे. मुंबई पोलिस दलातील परिमंडळ एकमधील 14 पथकांनी 24 तासांत 20 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. आणखी काही बांगलादेशी रडारवर आहेत.

Mumbai
Nilesh Lanke : दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय? खासदार लंकें विरोधकांना टोला

मुंबई, ठाणे (Thane) भागातील मानखुर्द, वाशी नाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण, मुंब्रा, दारुखाना येथून 16 बांगलादेशींना शोधून बेड्या ठोकल्या आहेत. दोन बांगलादेशींवर यापूर्वी गुन्हा दाखल असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. डोंगरी पोलिसांनी 20 जानेवारी रोजी दोन बांगलादेशी घुसखोरांवर गुन्हा नोंदवला.

Mumbai
Top Ten News : मणिपूरमध्ये शहांकडून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट ; आम आदमी पार्टीला महागात पडलं केजरीवालंचं 'ते' विधान - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

गेल्या 11 महिन्यांत मुंबईतून 156 बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरवात करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय शिधावाटप पत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करत त्यांची कोंडी करण्यात येत आहे.

2023 मध्ये एकट्या मुंबईतून 368 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी 2022 मध्ये मुंबईतून 147 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत अटक झालेल्या 696 बांगलादेशी नागरिकांपैकी 222 जणांना मायदेशी परत पाठविण्यात आले आहे.

दलाल रडारवर...

बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेट राज्यात कार्यरत आहे. दहशतवादविरोधी पथकाने यापूर्वी या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. बांगलादेशाची अंतर्गत कलहानंतर वाताहात झाली. त्यानंतर भारतात घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी सीमा भागात दलालांची साखळी वाढली असून, ती मोडून काढण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com