Aditya Thackeray : आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत...आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे.
Aditya Thackeray News :
Aditya Thackeray News : Sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray News : आमी जनतेतली लोक आहोत. त्यामुळे आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) 'वज्रमूठ' सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बोलत आहेत. त्यांनी यावेळी रिकाम्या खुर्च्यांवरुन शिंदे गटाला डिवचले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्हाला आज लिहून देतो. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा दावा ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray News :
Manmad APMC result : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे पानिपत!

जी कर्जमुक्ती महाविकास आघाडीच्या काळात झाली, ती कर्ज मुक्ती शेतकऱ्यांना मिळाली. कोरोना काळात अर्थचक्र बंद असतानाही, आपण शेतकऱ्यांना मदत केली. मात्र, आज अवकाळी पाऊस गारपीठ होत आहे, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. महिलांवर बेताल वक्तव्य करणारे मंत्री आहेत.

अनेक प्रकल्प राज्यातून गेले. ते सगळे प्रकल्प गुजरातला गेले. केंद्र सरकारकडून गुजरातला नियमीत झुकते माप मिळते. मात्र, महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी मुंबईतील अनेक विकास कामे सांगितली. मुंबई महापालिकेतील ठेवी नष्ट करण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray News :
Ahmednagar News: नगरमध्ये महाआघाडीचा डंका : 14 पैकी 7 बाजार समीतीवर वर्चस्व; भाजपच्या हाती फक्त तीन बाजार समित्या

हे सरकार मुंबईला तोडण्याचे काम करत आहे. पण हे आम्ही होऊ देणार नाही, असेही आदित्य म्हणाले. यावेळी आदित्य यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) नेत्यांचे आभार मानेले. ज्यांना सगळे दिले ते सोडून गेले आहेत. पण या सगळ्या लोकांनी आपल्याला साथ दिली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com