नितेश राणेंच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना दोन दिवसापूर्वी अटक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा कोकण दैारा शिवसैनिकांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
Nitesh Rane, Aditya Thackeray
Nitesh Rane, Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेनंतर शिवसेना नेते, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग येथे जाणार आहेत. त्यामुळे कोकणात (Konkan) शिवसेना विरुद्ध संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राणे विरुद्ध शिवसेनेत राडा झाला होता. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना दोन दिवसापूर्वी अटक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा कोकण दैारा शिवसैनिकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. (Aditya Thackeray News Updates)

ता. ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आदित्य ठाकरे हे कोकणात असणार आहेत. त्यापूर्वी ते गोव्यात निवडणुक प्रचाराला जाणार आहेत. गोव्याचा प्रचार करून याच काळात आदित्य सिंधुदुर्गात जाणार आहेत. गोव्याच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते, मंत्री येणार असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे येणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितलं आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने (४ तारखेपर्यंत) २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे नितेश राणे हे दोन दिवसापासून कणकवली पोलिस ठाण्यातील कोठडीत आहेत.

नितेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर शरणागती पत्कारली होती. यानंतर न्यायालयात राणेंच्या पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद झाला. पोलिसांनी नितेश राणे यांची १० दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने नितेश राणे यांना केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Nitesh Rane, Aditya Thackeray
'पुणे-नाशिक रेल्वे'च्या तरतूदीचे वृत्त दिशाभूल करणारे : अमोल कोल्हे

'न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत आहे,' असं आमदार नितेश राणे यांनी न्यायालयासमोर हजर होण्यापूर्वी सांगितलं.

तर दुसरीकडे सचिन वाझे प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला सन २०२०मध्ये पुन्हा सेवेत घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश होते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडूनही त्यासाठी दबाव आणला जात होता, असा खळबळजनक आरोप बडतर्फ पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 'ईडी'ला दिलेल्या जबाबात केला आहे. हा जबाब 'ईडी'ने अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपपत्रात नमूद केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com