Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; काय आहे प्रकरण ?

Mumbai High Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्याला चिथावणी दिल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर आहे.
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama

Gunratna Sadavarte News : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात एकामागून एक केसेस तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, याचवेळीसदावर्तेंविरोधात महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात होती. आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्याविरोधात राज्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून सुरू असलेल्या शिस्तभंग कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी त्यांच्या विरोधात राज्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून सुरू असलेल्या शिस्तभंग कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी शुक्रवारी ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

Gunratna Sadavarte
Hasan Mushirff News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव, 'हे' आहे कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्याला चिथावणी दिल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर आहे. तसेच काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधणे हे वकिली पेशाला साजेसं नसून त्यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा बार कौन्सिलने करत त्यांना २४ फेब्रुवारीला सुनावणीला हजर रहाण्यास सांगितले होते.

Gunratna Sadavarte
MLA Ravindra Dhangekar: पैशांंचा पाऊस.. निकालानंतर धंगेकरांनी सांगितले निवडणूक काळातील 'ते' प्रसंग...

उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत शरद पवार प्रकरणी पोलिसांनी सी समरी रिपोर्ट दाखल केल्याचा आणि त्यांच्या विरोधातील इतर तक्रारी मागे घेतल्याचा दावा करत त्यांच्या विरोधातील कारवाई रद्द करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. या चौकशी समितीच्या अध्यक्ष स्थानी ड गजानन चव्हाण असतील अॅड. कैसर अन्सारी आणि संग्राम देसाई हे सदस्य असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com