Rahul Kul On Sanjay Raut : 'क्लिन चिट'नंतर कुल यांनी राऊतांना डिवचलं; म्हणाले, "लोकांनी मला दोनदा..."

Sanjay Raut Vs BJP : भाजप म्हणजे भ्रष्ट लोकांना रंगसफेदी देण्याचा कारखाना, राऊतांची टीका
Rahul Kul, Sanjay Raut
Rahul Kul, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी विधिमंडळात शुक्रवारी आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चिट' देण्यात आली. यानंतर मला लोकांनी दोन वेळा निवडून दिल्याचे सांगत कुल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची 'दुखरी नस' दाबण्याचा प्रयत्न केला. कुल यांना क्लिन चिट दिल्याने राऊतांनी भाजपसह कुल यांच्यासह सडकून टीका केली. या प्रकरणामुळे राऊत-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात आणखी भर पडली. (Latest Political News)

कुल यांनी भीमा पाटस करखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. या प्रकरणी कुल यांना क्लिन चिट मिळाली असून त्यांच्या पुढील मोठा अडथला दूर झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर आमदार कुल यांनी राज्यसभेचे खासदार असल्याचा धागा पकडून राऊतांवर निशाणा साधला.

ते म्हणाले, "त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले, त्यातील एकही खरा ठरलेला नाही. एकेकाळी ते म्हणाले होते, गुवाहाटीवरून ४० मृतदेह येतील, तसे काही झाले का? त्यामुळे त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका. लोकांनी मला दोन वेळा निवडून दिले आहे, ही 'क्लिन चिट' लोकांची आहे."

राऊतांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे सांगताना कुल म्हणाले,"सत्य काय आहे हे त्यांना माहिती नाही. मी आरोप झाल्यावर तीन दिवसांनीच सर्वांच्या असलेल्या शंकांचे निरसन केले होते. यापूर्वीही अशा चौकशा झालेल्या असून त्यात काहीही तथ्य आढळून आलेले नाही आणि यापुढेही काही बाहेर येणार नाही. उलट आरोप झाल्यावर माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी निषेध केला होता."

दरम्यान, सरकारने 'क्लिन चिट' दिल्यानंतर राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुलांना लक्ष्य करीत सडकून टीका केली होती. भाजपने भ्रष्ट लोकांना रंगसफेदी करण्याचा कारखाना काढला आहे. भाजपच स्वतःचे आणि इतरातंच्या भ्रष्ट लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करता आहे. या सर्वांना आमचे सरकार आल्यानंतर तुरुंगात टाकणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com