Sharad Pawar Retirement: जितेंद्र आव्हाडानंतर राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा...

Maharashtra Politics| आज सकाळीच जितेंद्र आव्हाड यांनीही राजीनामा दिला
Sharad Pawar Retirement:
Sharad Pawar Retirement:ANI

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातील हालचालींना वेग आला आहे. असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. (After Jitendra Awhad, NCP MLA Anil Patil also resigned)

शरद पवार यांच्या मनपरिवर्तनाचं काम सुरु आहे. शरद पवार यांनी किमान २०२४ पर्यंत तरी त्यांनी अध्यत्रपदी कायम राहावं अशी आमची मागणी करत आहोत, अशी माहिती स्वत: अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, आज चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सिल्वर ओकला होणार असल्याचे समजते जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित‌ राहणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

Sharad Pawar Retirement:
Darwha and Arni APMC Result : दारव्ह्यात संजय राठोड, तर आर्णीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व !

शरद पवार(Sharad Pawar), अजित पवार, जयंत पाटील यांनी पक्षातील पदाधिकारी, का्र्यकर्ते यांना राजीनामा न देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर देखील हे राजीनामास्त्र अद्यापही थांबलेलं नाही. यातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या पदाचा राजीनामा दिला. याचवेळी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com