
Raosaheb Danve News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार मंगप्रभात लोढा आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवसेंदिवस त्यांच्याविरोधात रोष वाढत चालला असताना आता भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दानवे यांच्या विधानामुळे आता वाद आणखीच उफाळून येणार असल्याचे दिसत आहे.
महाविकास आघडी कडून राज्यपालांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे, असे माध्यमांनी विचारला होता. राज्यपालांनी कोणत्या पार्श्वभूमीतुन हे वक्तव्य केले याची एकदा चौकशी होण गरजेचं आहे. मी पण शिवप्रेमी आहे. मलाही असं वाटतं की शिवाजी बद्दल असं वक्तव्य कोणी करु नये. खरंतर शिवाजी अवमान करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. का याचाही विचार झाला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ एका ट्विटवर युजरने पोस्ट केला आहे.
दरम्यान , त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही रावसाहेब दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.''भाजपाच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आता परत एकदा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करत भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली असल्याचा आणखी एक पुरावा आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.