'एपीआय'सह 'पीएसआय'ला खंडणी प्रकरणात अटक होताच 'आयपीएस'ची उचलबांगडी

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील खंडणीचे आणखी एक रॅकेट नुकतेच समोर आले.
Mumbai Police
Mumbai Police Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील खंडणीचे (Extortion) आणखी एक रॅकेट नुकतेच समोर आले. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (API) उपनिरीक्षकाला (PSI) पकडण्यात आले तर, मुख्य सूत्रधार पोलीस निरीक्षक (PI) फरार झाला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी आता पोलीस उपायुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे हे परिमंडळ दोनच्या हद्दीत आहे. आयपीएस (IPS) सौरभ त्रिपाठी यांच्याकडे या परिमंडळाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार होता. त्यांची आता तातडीने बदली करण्यात आली आहे. अपवादात्मक प्रकरण आणि जनहिताच्या दृष्टिकोनातून ही बदली करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्रिपाठी यांची आता ऑपेरशन्स विभागात बदली झाली आहे. परिमंडळ दोनचा अतिरिक्त कार्यभार आयपीएस शशिकुमार मीना यांच्याकडे देण्यात आला आहे.

Mumbai Police
ईडीच्या कारवाईची मलिकांना आधीच होती माहिती! मुलीनंच केला गौप्यस्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कदम (एपीआय), समाधान जमदाडे (पीएसआय) आणि ओम वंगाटे (पीआय) हे खंडणी वसूल करीत होते. हे त्रिकूट कोट्यवधी रुपयांच्या मालाची ने-आण करणाऱ्या अंगडिया तथा कुरिअर व्यावसायिकांना प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. गुन्हे शाखेच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने (Central Intelligence Unit) हा प्रकार उजेडात आणून ही कारवाई केली होती.

Mumbai Police
मोदीजींनी सांगितलं तर पुतीन नक्की ऐकतील! युक्रेनची थेट मध्यस्थीसाठी गळ

हिरे, माणके, सोने, दागिने, रोकडसह मौल्यवान चीजवस्तूंची मोठ्या ने-आण करणारा मुंबईचा अंगडिया बाजार हा दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथील मुंबादेवी मंदिर परिसरात पोफळवाडीत आहे. तेथील काही संशयित व्यापाऱ्यांना धमकावून या पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे उकळले आहेत. त्याबाबतच्या कारवाईची कसलीच नोंद त्यांनी स्टेशन डायरीत केलेली नाही. मात्र, अंगडिया बाजारातील सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले. हा भक्कम पुरावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआययूच्या हाती लागला. अखेर एपीआय आणि पीएसआयला अटक झाली पण पीआय अद्याप फरार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com