Maharashtra Politics : सत्तार, पाटलांनंतर अमेय खोपकर त्याच भाषेत बोलले...

Maharashtra Politics : अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रावादीवर गलिच्छ भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता अमेय खोपकरांनीही अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली आहे.
Hindu muslim Politics | Amey Khopkar
Hindu muslim Politics | Amey Khopkar
Published on
Updated on

Maharashtra Politics : ठाणे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ भाषेत टीका केली. ही बातमी ताजी असतानाच आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचीनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवराळ भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना खोपकर यांनीही अपशब्द वापरले आहेत. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा गलिच्छ भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी ठाण्यातील एका चित्रपटगृहात शिरुन 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद केला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचही बोलले जात आहे. त्यानंतर आव्हाडांनी बंद केलेला शो मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुढच्या अर्ध्या तासात सुरु केला. यावरुन आव्हाड आणि मनसेमध्येही वादाची ठिणगी पडली.

इतकचं नाही तर माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेत चित्रपटातील काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. संभाजीराजेंच्या या आक्षेपानंतर राज्यातील मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केला जात आहे. चित्रपटावरुन हा गदारोळ सुरु असातनाच जितेंद्र आव्हाडांनी थेट चित्रपटाचा शो बंद पाडल्याने या चित्रपटावरुन मनसे आणि राष्ट्रवादी संघर्ष सुरु झाला आहे

आव्हाडांनी शो बंद पाडल्यानंतर त्यांच्या या कृत्याला आव्हान देण्यासाठी काल संध्याकाळी त्याच चित्रपटगृहात पुन्हा हर हर महादेव चित्रपटाचा शो ठेवण्यात आला. यावेळी अमेय खोपकरांनी माध्यामांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर अगदी खालच्या पातळीची टीका केली. “तुम्ही एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या कुटूंबियांसमोर दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?”, असा हल्लाबोल खोपकरांनी केला आहे.

तसचं “अमोल मिटकरींना ध्यानात ठेवायचं. त्यांनी काल मला चॅलेंज केलं होतं ना? त्यांचं चॅलेंज स्वीकारलंय. हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आज ठाण्यात आलोय आणि हा चित्रपट पाहतोय. उगाच जातीपातीचं राजकारण करायचं आणि निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे”, असा आरोपही अमेय खोपकरांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर साम वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी आणि अमेय खोपकर यांच्यात चांगलीच जुंपली होती. दोघेही नेते एकमेकांवर शिवराळ भाषेत टीका करत होते. ' आव्हाडांच्या नाकावर टिच्चून आम्ही उद्या शो लावत आहोत, तू येऊन दाखव, असं आव्हानही खोपकरांनी मिटकरींना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com