Maharashtra BJP President: बावनकुळेंची जागा कोण घेणार? चव्हाण, कुटे, निलंगेकर, शिंदे, मुनगंटीवार रेसमध्ये...

New BJP State President Announcement Maharashtra : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असल्याने त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष कोण, याची उत्सुकता लागली आहे.
Maharashtra BJP Leaders
Maharashtra BJP Leaders Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद', असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठाकडे देण्याची तयारी भाजपने केल्याची सूत्राची माहिती आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे (BJP) नवे प्रदेशाध्यक्ष कोण, असतील याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या आघाडीवर आहे. रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

Maharashtra BJP Leaders
Sanjay Raut : बिनखात्याचे सरकार, भुजबळांचा जातीय राजकरणातून बळी, इथंच कर्माची फळ; राऊतांची महायुती सरकारला डिवचलं

तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्ती आहे. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra BJP Leaders
Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

जळगावमधील जामोदचे पाचवेळा आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी देखील चर्चेत आले आहे. ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. ते बहुजनांचे नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत. बावनकुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास कुटे यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

हा 'फॉर्म्युला' वापरण्याची शक्यता?

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. परंतु जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असून देखील त्यांच्याकडेच भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला जाणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील, अशी देखील चर्चा आहे.

शिंदे, मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी?

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचाही विचार देखील भाजपकडून पुढे आणला जात आहे. विधान परिषदचे सदस्य प्रा. राम शिंदे धनगर समाजाचे आहेत. फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. सध्या त्यांचे नाव विधान परिषदेचे सभापतीपदाच्या चर्चेत आहे. तिथं विचार न झाल्यास शिंदे यांच्या नावाचा विचार प्रदेशाध्यक्षपदासाठी होऊ शकतो.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यांचे पुनर्वसन कसे होणार, यावर देखील भाजप विचार करत असून, मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींनिमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com