CM Shinde on Viral Video: 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून सारवासारव; स्वत:च सांगितलं नेमकं काय घडलं होतं ?

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
CM Shinde
CM Shinde Sarkarnama

Mumbai News: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत सरकारला चांगलच घेरलं. अखेर यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये "बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं", अशा आशयाचे वक्तव्य ऐकण्यास मिळत आहे.

CM Shinde
Manoj Jarange On Viral Video : मराठा समाजाची दिशाभूल करणे खूप महागात पडेल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

यावरूनच विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत त्या दिवशी नेमकं काय चर्चा सुरु होती, ज्या मुद्यावर चर्चा झाली, त्याच प्रॅक्टिकल मुद्यांवर बोलूया, राजकीय विषय नको, अशी आमची चर्चा सुरू होती. कोणतेही राजकीय भाष्य नको, अशी चर्चा आम्ही करत होतो, असे सांगत शिंदे यांनी सारवासारव केली.

काही विघ्नसंतोषी लोकं हे सोशल मीडियावर संभ्रमाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसेच मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने चांगली भूमिका घेतली आहे, असे सांगत विरोधक खोडसाळपणे व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत असून हे निंदनीय असल्याचा हल्लाबोलही मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला.

Edited by - Ganesh Thombare

CM Shinde
CM Shinde on Viral Video : 'त्या' व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, हे खोडसाळपणाचे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com